Iphone 13 Flipkart Year End Sale : या वर्षी अॅपल आयफोन १४ सिरीज लाँच झाल्यानंतर आयफोन १३ आणि १२ सिरीजच्या किंमतीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. फ्लिपकार्टवर सध्या Year end sale सुरू असून यात आयफोनवर घसघशीत सूट मिळत आहे. तुम्ही नवीन आयफोन घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे.
फ्लिपकार्टवर iphone 13 १२८ जीबी व्हेरिएंट तुम्ही ४४ हजार ४९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकतो. फ्लिपकार्टवर आयफोन १३ स्मार्टफोनची लिस्टेड किंमत ६९ हजार ९०० रुपये आहे. मात्र, त्यावर ११ टक्के सूट देण्यात आल्याने किंमत ६१ हजार ९९९ रुपये झाली आहे. त्यावर बँक ऑफरदेखील मिळत आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्ड वापरल्यास तुम्हाला ५ टक्के कॅशबॅक मिळते. फोनवर एक्सचेंज ऑफरदेखील मिळत आहे. त्याद्वारे जुना आयफोन देऊन तुम्ही आणखी बचत करू शकता.
(कॅमेरा टेस्टचा धक्कादायक निकाल, ‘या’ फोनने IPhone 14 Pro आणि Galaxy S22 Ultra स्मार्टफोनला पछाडले)
एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही १७ हजार ५०० रुपयांपर्यंतची बचत करू शकता. म्हणजेच, हा फोन तुम्ही ४४ हजार ४९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. मात्र, एक्सचेंज ऑफर हे स्मार्टफोनचे मॉडेल आणि त्याच्या स्थितीवर अवलंबून आहे. तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असल्यास तुम्हाला या ऑफरद्वारे मोठा लाभ होऊ शकतो.
फीचर्स
iphone 13 स्मार्टफोनमध्ये १२८ जीबी इंटरनल स्टोअरेज मिळते. फोनला मागे ड्युअल कॅमेरा सेटअप असून त्यात १२ मेगपिक्सेलचे दोन कॅमेरे मिळतात. सेल्फीसाठीदेखील फोनमध्ये १२ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. आयफोन १३ ५जा सपोर्ट करतो.