IPhone 14 Smartphone Huge Savings : अलीकडे अॅपल iPhone 14 आपल्या क्रॅश डिटेक्शन फीचर आणि एसओएस सॅटेलाईट केनेक्टिव्हिटी फीचरमुळे चर्चेत आहे. या फिचर्समुळे अडचणीत सापडलेल्या काही लोकांची मदत झाल्याचे काही अहवालांतून समोर आले होते. आयफोन १४ लाँच झाल्यापासूनच ग्राहकांना भुरळ घालत आहे. तुम्हीही या फोनचे मालक होऊ शकता आणि तेही मोठ्या बचतीसह. ७८ हजार ९०० रुपयांचा हा फोन तुम्ही ६२ हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता. म्हणजे चक्क १६ हजार ३०० रुपयांची बचत करू शकता. कशी होऊ शकते ही बचत? जाणून घेऊया.
ऑफर आयफोन १४ स्मार्टफोनच्या १२८ जीबी व्हेरिएंटवर उपलब्ध आहे. अमेझॉनवर या फोनची लिस्टेड किंमत ७७ हजार ९०० रुपये आहे. मात्र, त्यावर १५०० रुपयांची सूट देण्यात आल्याने हा फोन ७८ हजार ४०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. परंतु, यावर तुम्ही आणखी सूट मिळवू शकता. एचडीएफसी बँक आणि क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शनवर आणखी ५००० रुपयांची सूट मिळत आहे. याने हा फोन तुम्हाला ७३ हजार ४०० रुपयांमध्ये मिळू शकतो.
(Save नसलेल्या नंबरवरही पाठवू शकता Whatsapp Message, फॉलो करा ‘या’ स्टेप्स)
कंपनी एक्सचेंज ऑफरदेखील देत आहे. तुम्ही जुना फोन देऊन १६ हजार ३०० रुपयांची बचत करू शकता. या ऑफरद्वारे तुम्हाला हा फोन ६२ हजार १०० रुपयांमध्ये मिळू शकतो. परंतु, एक गोष्ट लक्षात ठेवा, फोनच्या बदल्यात मिळणारी सूट ही फोनच्या कंडिशनवर अवलंबून असेल.
फीचर्स
iPhone 14 स्मार्टफोनमध्ये ६.१ इंच डिस्प्ले, ए १५ बायोनिक चिप आणि आयओएस १६ मिळते. फोनमध्ये मागे १२ मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि सेल्फीसाठी १२ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.