आजच्या काळात प्रत्येजान हा स्मार्टफोन वापरत असतो. काही कालावधीनंतर आपण नवीन स्मरफोन घेत असतो , जो आकर्षक फीचर्स आणि अपडेटेड असतील. जर तुम्ही २०२३ मध्ये स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर काही लाँच होणाऱ्या या कंपन्यांच्या स्मार्टफोन खरेदी करण्याबाबत विचार करायला हवा. फेब्रुवारी महिन्यात Samsung आणि OnePlus सारख्या मोठ्या कंपन्या नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहेत. तसेच यामध्ये Oppo आणि Vivo सारखे प्रसिद्ध ब्रँडदेखील आपले स्मार्टफोन लाँच करणार आहेत.
Samsung Galaxy S23 Series
सॅमसंग कंपनी १ फेब्रुवारी रोजी गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये त्यांची फ्लॅगशिप सिरीज लाँच करणार आहे. यामध्ये सॅमसंग तीन मॉडेल्स लाँच करणार आहे. यात Galaxy S23, Galaxy S23 Plus आणि Galaxy S23 Ultra हे तीन मॉडेल्स असणार आहेत. नवीन फोन घेताना तुम्ही या सिरीजचा विचार करू शकता.
हेही वाचा : लाँच होण्याआधीच Samsung Galaxy च्या S23 Series चे फीचर्स लीक; जाणून घ्या किंमत
OnePlus 11
वनप्लस कंपनी ७ फेब्रुवारी रोजी OnePlus ११ लाँच करेल अशी अशा आहे. OnePlus चा या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 हा प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देखील असू शकते. याचा डिस्प्ले हा 2K एमओलईडी स्क्रीनचा येईल. फोनमध्ये १६ जीबी रॅम मिळू शकते. OnePlus 11 स्मार्टफोनमध्ये ६.७ इंच अमोलेड डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ८ जेन २ एसओसी, ५००० एमएएच बॅटरी आणि १०० वॉट फास्ट चार्जिंग मिळणार आहे.
Realme GT Neo 5
Realme कंपनी ८ फेब्रुवारी रोजी Realme GT Neo 5 हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. याचा डिस्प्ले ६.७४ इंचाचा ओलईडी डिस्प्ले येईल. तसेच हा स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 हा प्रोसेसर असणार आहे. रिअलमी जीटी निओ ५ वेगवेगळ्या बॅटरी क्षमतेसह दोन प्रकारांमध्ये येऊ शकतो . २४० वॅटचे फास्ट चार्जिंग आणि ४६००mAh क्षमतेची बॅटरी व १५० वॅट फास्ट चार्जिंग आणि ५०००mAh क्षमतेची बॅटरी असे दोन प्रकार असू शकतात.
Oppo Find N2 Flip
या फोनमुळे ओप्पो आणि सॅमसंगमध्ये स्पर्धा होऊ शकते. ओप्पोने फोल्डेबल स्मार्टफोन्सच्या बाबतीत नवीन सिरीजची घोषणा करणे अपेक्षित आहे. असे झाल्यास सॅमसंग च्या फ्लिप ४या स्मार्टफोनला ओप्पोच्या फाईंड एन २ फ्लिप हा स्मार्टफोन चांगलीच स्पर्धा देऊ शकतो.