ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल सुरू आहे. हा सेल २३ जुलै ते २७ जुलै दरम्यान फ्लिपकार्टवर लाइव्ह असेल. या सेलदरम्यान स्मार्टफोन्सवर उत्तम सूट आणि ऑफर्स उपलब्ध आहेत. तुम्हालाही तुमचा जुना स्मार्टफोन अपग्रेड करायचा असेल किंवा नवीन फोन घ्यायचा असेल, तर फ्लिपकार्टवर चालणाऱ्या या सेलमध्ये तुमच्यासाठी सर्वोत्तम डील आणल्या आहेत. Flipkart वर सुरू असलेल्या सेल दरम्यान, POCO चा 5G स्मार्टफोन सेल दरम्यान दहा हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे. येथे आम्ही तुम्हाला POCO M4 5G स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल तपशीलवार माहिती देत आहोत.
POCO M4 5G ऑफर
POCO M4 5G स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर स्वस्तात खरेदी केला जाऊ शकतो. Poco च्या या स्मार्टफोनची किंमत १०,७४९ रुपये आहे. कोटक बँकेच्या क्रेडिट कार्डवर या फोनवर १००० रुपयांची सूट मिळत आहे. या डिस्काउंटसह, हा फोन फक्त ९,७४९ रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. यासोबतच Axis Bank क्रेडिट कार्डवर ७५० रुपयांची सूट मिळत आहे. Axis Bank वापरकर्ते फोन फक्त ९९९९ रुपयांना खरेदी करू शकतात. तुम्हाला जुना स्मार्टफोन एक्सचेंज करायचा असेल तर तुम्ही Poco चा हा पॉवरफुल फोन अतिरिक्त एक्सचेंज बेनिफिटसह आणखी स्वस्तात खरेदी करू शकता.
( हे ही वाचा: लवकरच लाँच होणार iPhone 14; जाणून घ्या किंमत आणि बरंच काही)
POCO M4 5G किंमत
POCO M4 5G स्मार्टफोन दोन प्रकारांमध्ये विक्रीसाठी येतो. ४जीबी रॅम आणि ६४जीबी स्टोरेजसह या फोनचा बेस व्हेरिएंट १०७४९ रुपयांच्या किमतीत विक्रीसाठी येतो. यासोबतच, ६जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज असलेला व्हेरिएंट १२,७४९ रुपयांना विक्रीसाठी येतो.
POCO M4 5G तपशील आणि वैशिष्ट्ये
Poco M4 5G स्मार्टफोनमध्ये ६.५८ इंचाचा फुल एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे ज्याचे रिझोल्यूशन २४०० x १०८० पिक्सेल आहे, रिफ्रेश रेट ९०Hz आहे. या पोको फोनचा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ संरक्षणासह येतो. हा पोको स्मार्टफोन MediaTek च्या Octa-core Dimensity ७०० प्रोसेसरसह येतो, ज्यामध्ये ग्राफिक्ससाठी Mali G57 GPU देण्यात आला आहे. Poco चा हा फोन Android १२ वर आधारित MIUI १३ वर चालतो.
( हे ही वाचा: 5000mAh बॅटरीसह Oppo चा स्वस्तात मस्त फोन खरेदी करा; मिळेल मोठी सूट)
कॅमेरा डिपार्टमेंट बद्दल बोलायचे झाले तर फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्राथमिक कॅमेरा ५०एमपी आहे, ज्यामध्ये २एमपी डेप्थ सेन्सर आणि ८एमपी फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये ५०००एमएएच बॅटरी आणि १८वोल्ट फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. या फोनमध्ये टाइप-सी पोर्ट, साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.