उन्हाळा सुरू झाला असून आता अशा परिस्थितीत बाजारपेठांमध्ये एसीची मागणी खूप वाढली आहे. अनेक ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्स सर्व ब्रँड्सच्या एसींवर प्रचंड सवलत आणि आकर्षक ऑफर देत आहेत. तुम्हीही नवीन एसी घेणार असाल तर या गोष्टींकडे लक्ष द्या. बाजारात एसीच्या दोन कॅटेगरी आहेत, तुम्ही कोणत्या कॅटेगरीचा एसी घ्यावा ते जाणून घ्या.

एसीच्या आहेत या दोन कॅटेगरी

तुम्हाला माहीत असेलच, साधारणपणे बाजारात दोन प्रकारचे एसी मिळतात त्यातील एक इन्व्हर्टर एसी आणि एक नॉन-इन्व्हर्टर एसी. तर तुम्हाला एसीच्या या दोन कॅटेगरीमध्ये काय फरक आहे आणि तुम्ही कोणत्या प्रकारचा एसी घ्यावा हे जाणून घेणार आहोत.

Husband picking up wife and play game see waht happend next funny video goes viral
“भावा बायकोला उचलून घ्यायचं म्हंजी खायचं काम नाय” ‘ही’ स्पर्धा पाहून पोट धरुन हसाल; VIDEO मध्ये पाहा शेवटी कोण जिंकलं
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
My Name The Night Agent Vincenzo The Glory
नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन आहे? रविवारी पाहा ‘या’ जबरदस्त सस्पेन्स-थ्रिलर वेब सीरिज, वाचा यादी
desi jugaad video old fridge convert into shoe rack
बाबो! खराब फ्रीजचा असा वापर तुम्ही आयुष्यात कधी पाहिला नसेल; Video पाहून युजर्सनी मारला कपाळावर हात
Dog Viral Video
श्वानाला झोप अनावर झाल्यानं बसल्या जागी केलं असं काही… VIDEO पाहून पोट धरून हसाल
The extraordinary dance of foreign youths
‘सोनी कितनी सोनी आज तू लगती वे…’ गाण्यावर मुंबईतील रस्त्यावर परदेशातील तरुणांचा भन्नाट डान्स; VIDEO होतोय व्हायरल
Puneri pati in outside temple for couples funny photo goes viral on social media
PHOTO: “प्रेमी युगुलांना इशारा…” मंदिराबाहेर लावली खतरनाक पुणेरी पाटी; वाचून पोट धरुन हसाल

एसीमध्ये इन्व्हर्टर आणि नॉन-इन्व्हर्टर यातील फरक जाणून घ्या

एसीमध्ये इन्व्हर्टर टेक्नॉलजी आहे जी इलेक्ट्रिक व्होल्टेज, करंट आणि वारंवारता यासाठी कंट्रोलर म्हणून काम करते. हे इन्व्हर्टर एसी कंप्रेसरला वीज पुरवठ्यामध्ये फेरफार करून थंड किंवा गरम नियंत्रित करण्यास परवानगी देते. हे इन्व्हर्टर एसीला कूलिंग इफेक्टवर अचूक नियंत्रण ठेवण्यास देखील अनुमती देते.

इन्व्हर्टर नसलेल्या एसीमध्ये, तापमान स्थिर करण्यासाठी फक्त कंप्रेसरला चालू किंवा बंद करण्याचा पर्याय असतो. ते स्पष्टपणे फिक्स केलेल्या कूलिंग पॉवरसह येतात, याचा अर्थ एसी आसपासच्या तापमानावर अवलंबून कंप्रेसर चालू किंवा बंद करू शकतो.

हा एसी तुमच्यासाठी चांगला आहे

सामान्य एसीच्या तुलनेत इन्व्हर्टर एसीचा एक फायदा म्हणजे ते तापमान स्थिर ठेवू शकतात. तर नॉन-इन्व्हर्टर एसीमध्ये तापमान बदलू शकते. उदाहरणार्थ, जर तुम्ही एसी २४ डिग्रीवर सेट केला असेल, तर इन्व्हर्टर एसी संपूर्ण ऑपरेशनमध्ये तापमान तुम्ही सेट केला आहे तसेच राखेल, तर नॉन-इनव्हर्टर एसी तापमान १ किंवा २ अंशांनी वाढवू किंवा कमी करू शकतो. आधुनिक इन्व्हर्टर एसी R32 रेफ्रिजरंट वापरतात जे केवळ घरातला परिसर थंड करण्याची क्षमताच देत नाही तर कमी हानिकारक उत्सर्जन देखील कमी करते.

इनव्‍हर्टर एसी साधारणपणे नॉन-इन्व्‍हर्टर एसी पेक्षा महाग असतात. तथापि, त्यांची ऑपरेटिंग किंमत दीर्घ कालावधीसाठी कमी आहे, कारण ते आवश्यकतेनुसार उच्च आणि कमी दोन्ही क्षमतेवर कार्य करू शकतात.