Reliance Jio ही देशातील एक मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओने देशातील अनेक शहरांमध्ये आपले ५ जी नेटवर्क सुरू केले आहे. तसेच सध्या सुरू असलेले IPL २०२३ देखील जिओ सिनेमावर क्रिकेटप्रेमींना पाहता येत आहे. यातच जिओने प्रीमियम सब्स्क्रिप्शन प्लॅन लॉन्च केला आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना अधिक कंटेंट पाहता येईल. जिओसिनेमाने प्रीमियम सब्स्क्रिप्शन प्लॅन खरेदी करण्यासाठी तुम्हाला जिओसिनेमाच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. नंतर सब्स्क्रिप्शन बटणावर क्लिक करा. या सब्स्क्रिप्शन प्लॅनची किंमत वर्षाला ९९९ रुपये इतकी आहे. 

जिओसिनेमा App तुम्ही अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही डिव्हाइसवर डाउनलोड करू शकता. जिओसिनेमाचा प्रीमियम प्लॅन आता नेटफ्लिक्स , Amazon प्राईम डिस्नी हॉटस्टार सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करेल. तर या चारही प्लॅटफॉर्ममधले सब्स्क्रिप्शन प्लॅन्सच्या किंमती, त्यावर कोणकोणता कंटेंट पाहता येतो. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Viral Video: 3 Essential Instagram Settings You Must Enable Before Sharing photo or video
‘या’ तीन Settings केल्याशिवाय Instagram वर फोटो किंवा व्हिडीओ शेअर करू नका, पाहा Viral Video
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Biggest Ola Season Boss Sale
मित्राने इलेक्ट्रिक स्कूटर घेतली, तर तुम्हाला ३००० रुपये मिळणार; पाहा कंपनीच्या Boss sale मध्ये काय ऑफर्स असणार?
Sarasbaug's viral video
Pune Video : सारसबागचं असं सौंदर्य तुम्ही कधीही पाहिलं नसेल! व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
Samsung Galaxy S24 FE Pre booking Details
Samsung Galaxy : प्री-बुकिंग करा अन् सात हजार रुपयांचे डिस्काउंट मिळवा! किंमत, फीचर्स, व्हेरिएंटबद्दल जाणून घ्या
Monsoon special know how to make dry paneer manchurian recipe
घरीच घ्या हॉटेलसारख्या ‘ड्राय पनीर मंचूरियन’ चा आस्वाद; सोपी मराठी रेसिपी नक्की ट्राय करा
Tata nexon cng launched
टाटाचा नाद करायचा नाय! नव्या अवतारात लॉन्च झाली ही सीएनजी कार, पॉवरफुल इंजिन अन् मायलेजसह किंमतही कमी
First Glimpse of Swargate Metro Station!
Pune Video : स्वारगेट मेट्रो स्टेशनची पहिली झलक! व्हायरल व्हिडिओ एकदा पाहाच

हेही वाचा : भारतात लॉन्च झाला JioCinema चा ‘हा’ जबरदस्त प्लॅन, HBO कंटेंट आणि…, जाणून घ्या काय आहे किंमत ?

जिओसिनेमा प्रीमियम Vs नेटफ्लिक्स Vs Amazon प्राईम व्हिडीओ Vs डिस्नी हॉटस्टार या भारतातील ४ प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्ममधील तुलना पाहुयात.

जिओसिनेमाचा प्रीमियम हे एक वर्षाचा प्लॅन ऑफर करते ज्याची किंमत ९९९ रुपये आहे.

नेटफ्लिक्स कोणताही वार्षिक प्लॅन ऑफर करत नाही. नेटफ्लिक्सचा महिन्याचा मोबाईलवरील प्लॅन हा १४९ रुपयांचा आहे. महिन्याचा मूळ प्लॅन हा १९९ रुपयांचा आहे. तर महिन्याचा प्रीमियम प्लॅन हा ६४९ रुपयांचा आहे.

डिस्नी + हॉटस्टारचा प्रीमियम प्लॅन हा १,४९९ रुपयांचा आहे. एका वर्षासाठी (ज्यात जाहिराती दिसतात) असा ८९९ रुपयांचा सुपर प्लॅन आहे.

सर्वात शेवटी Amezon प्राईम व्हिडीओ २९९ रुपयांमध्ये महिन्याचा प्लॅन ऑर कतो. याचा वार्षिक प्लॅन हा १,४९९ रुपयांचा आहे.

हेही वाचा : खूशखबर! आता पर्सनल चॅट्स दुसऱ्यांपासून लवपता येणार, WhatsApp ने लॉन्च केलेले ‘हे’ फिचर एकदा पाहाच

JioCinema प्रीमियम प्लॅन वापरकर्त्यांना, स्मार्टफोन, टॅबलेट , टीव्ही आणि अन्य डिव्हाईसवर कंटेंट पाहण्याची परवानगी देते.यामध्ये वापरकर्ते एकाच वेळी ४ डिव्हाईसवर कंटेंट स्ट्रीम करू शकतात. हे 4 K रिझोल्यूशन ऑफर करते.

नेटफ्लिक्स हे ओटीटी प्लॅटफॉर्म भारतात अनेक विविध प्लॅन्स ऑफर करते. मोबाईल ओन्ली हा प्लॅन केवळ स्मार्टफोनवरच उपलब्ध आहे. बेसिक प्लॅन हा वापरकर्त्यांना सर्व डिव्हाईसवर कंटेंट स्ट्रीम करण्याची परवानगी देतो. मात्र एका वेळी एकाच डिव्हाईसवर ते पाहता येते. प्रिमीयम प्लॅन वापरकर्त्यांना 4 k रिझोल्युशनमध्ये एकाच वेळी ४ डिव्हाईसवर स्ट्रीम करण्याची परवानगी देतो.

Amazon प्राइम व्हिडिओच्या वार्षिक प्लॅनची किंमत १,४९९ रुपये आहे. यामध्ह्ये वापरकर्त्यांना 4K रिझोल्यूशनमध्ये एकाच वेळी ३ डिव्हाईसवर स्ट्रीम करण्याची परवानगी देते. अन्य ५९९ रुपयांच्या प्लॅन हा वापरकर्त्यांना SD रिझोल्युशन देतो.

Disney + Hotstar चा प्रीमियम प्लॅन वापरकर्त्यांना 4K रिझोल्यूशनमध्ये एकाच वेळी ४ डिव्हाईसवर कंटेंट स्ट्रीम करण्याची परवानगी आहे. अन्य ८९९ रुपयांचा प्लॅन १०८० इतके रिझोल्युशन देते. त्यावर एका वेळी २ डिव्हाईसवर स्ट्रीम करण्याची परवानगी देते.

हेही वाचा : Google Bard vs ChatGPT: AI च्या जगात गुगल बार्डची चॅटजीपीटीला टक्कर, जाणून घ्या कोण ठरतंय वरचढ?

साध्य सुरु असलेल्या IPL २०२३ च्या मोफत लाईव्ह स्ट्रीमिंगमुळे जिओसिनेमा प्रीमियमने भारतात दर्शकांची संख्या वाढली आहे. जिओसिनेमाने प्रीमियम प्लॅन लॉन्च केल्यामुळे वापरकर्ते आता HBO सारख्या कंटेंटचा आनंद घेऊ शकणार आहेत. JioCinema Premium पाहता येणाऱ्या काही सर्वोत्तम HBO कंटेंटमध्ये द लास्ट ऑफ अस, हाऊस ऑफ द ड्रॅगन आणि सक्सेशन यांचा समावेश आहे. जिओसिनेमा App तुम्ही अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही डिव्हाइसवर डाउनलोड करू शकता

HBO ओरिजिनल आणि IPL चे लाईव्ह स्ट्रीमिंग काढून टाकल्यानंतर Disney+ Hotstar वर आता USP मार्वल फिल्म आणि सिरीज दिसते. यासह तुम्ही WandaVision, Loki, Moon Knight, The Falcon and the Winter Soldier यासह सर्व मार्वल सिरीज इथे पाहू शकता.

नेटफ्लिक्समध्ये खूप पप्रकारचे मूळ कंटेंटमध्ये स्टॅन्ड अप कॉमेडी , कॉमेडी शो , रिऍलिटी शो पॅफ्त येतात. नेटफ्लिक्सवर उपलब्ध क्काही फिल्म सिरीजमध्ये मनी हेस्ट, द स्ट्रेंजर थिंग्ज, वेन्सडे, डोंट लूक अप, शी, डॅमर इतर फिल्मचा समावेश आहे.

Amazon प्राईम व्हिडिओमध्ये द फॅमिली मॅन, मेड इन हेवन, फरझी, सिटाडेल आणि यासह खूप कंटेंट पाहायला मिळतो. याशिवाय तुम्ही जेव्हा Amazon प्राईम मेंबरशिप खरेदी करता तेव्हा तुम्हाला Amazon Music, Kindle आणि इतर प्राइम फायदे देखील वापरकर्त्यांना मिळतात.Amazon प्राईम व्हिडिओमध्ये द फॅमिली मॅन, मेड इन हेवन, फरझी, सिटाडेल आणि यासह खूप कंटेंट पाहायला मिळतो. याशिवाय तुम्ही जेव्हा Amazon प्राईम मेंबरशिप खरेदी करता तेव्हा तुम्हाला Amazon Music, Kindle आणि इतर प्राइम फायदे देखील वापरकर्त्यांना मिळतात.