इन्स्टाग्राम हे मेटाचे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून फोटो, व्हिडीओ, रील्स, असा वेगवेगळ्या प्रकारचा कंटेन्ट शेअर करण्यात येतो. तरुणांसह लहान मुलांनाही सतत इन्स्टाग्रामवर कंटेन्ट पाहण्याची किंवा शेअर करण्याची सवय लागली आहे. त्यामुळे इन्स्टाग्रामकडुनही युजर्सना आकर्षित करण्यासाठी सतत नवे फीचर रोल आउट केले जातात. आता तर काही फीचर्स एकत्र इन्स्टाग्रामवर उपलब्ध झाले आहेत, कोणते आहेत ते फीचर्स आणि कसे वापरायचे जाणून घ्या.

इन्स्टाग्रामवर रोल आउट करण्यात आलेले नवे फीचर

आणखी वाचा: युट्यूब व्हिडीओमध्ये सबटायटल्स कसे अ‍ॅड करायचे? जाणून घ्या याच्या सोप्या स्टेप्स

कॅण्डिड स्टोरीज फीचर
कॅण्डिड स्टोरीज फीचरचा वापर करून, इन्स्टाग्राम युजर्सना आपले कॅण्डिड फोटो शेअर करता येणार आहेत. जे ‘बीरिअल अ‍ॅप प्रमाणे असेल. या फीचरचा वापर करून युजर्सने ते त्या वेळी काय करत आहेत हे स्टोरीमध्ये शेअर करता येणार आहे. ही स्टोरी फक्त त्यांनाच पाहता येईल ज्यांनी स्वतःची कॅण्डिड स्टोरी देखील शेअर करत असतील.

न्यु ग्रुप प्रोफाइल पिक्चर्स
या फीचरचा वापर करून युजर्सना नव्या प्रोफाइलमध्ये अ‍ॅड होऊन निवडक व्यक्तींबरोबर पोस्ट, फोटो शेअर करता येतील. प्लस आयकॉनवर क्लिक करून तुम्ही नवीन प्रोफाइल बनवु शकता, तसेच त्यामध्ये इतरांना अ‍ॅड करू शकता. जेव्हा तुम्ही या प्रोफाइलमध्ये फोटो शेअर कराल, तेव्हा तुम्ही निवडलेल्या व्यक्तींनाच ते पाहता येईल, तुमच्या फॉलोवर्सना हा कंटेन्ट उपलब्ध नसेल.

आणखी वाचा: WhatsApp वर आता मेसेजसाठीही होणार View Once सुविधा उपलब्ध; लगेच जाणून घ्या

नोट्स
नोट्स फीचरचा वापर करून युजर्सना टेक्स्ट स्वरूपात त्यांचे विचार शेअर करता येणार आहेत. यामध्ये केवळ अक्षर आणि ईमोजी वापरता येईल. यामध्ये ६० अक्षरमर्यादा (Character Limit) आहे. इनबॉक्समध्ये तुम्ही सहज नोट शेअर करू शकता, तसेच यामध्ये तुम्ही कोणाबरोबर नोट शेअर करू इच्छिता हे देखील निवडता येते.