भारताचे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी Google चे सीईओ सुंदर पिचाई यांची भेट घेतली. ही भेट अमेरिकेतील गुगलच्या मुख्यालयात झाली . दोघांनी या भेटीमध्ये ‘Make In India’ वर चर्चा केली. गुगल हे एक सर्च इंजिन आहे. कोणाला कोणत्याही प्रकारची माहिती मिळवायची असल्यास ते सर्वप्रथम गुगलची (Goggle)मदत घेतात. गुगलची भारत ही मोठी बाजारपेठ आहे. हजारो वापरकर्ते याचा वापर करतात.
मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी ट्विट करत या भेटीची माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले, ”सुंदर पिचाई यांच्याशी ‘मेक इन इंडिया’ च्या कार्यक्रमांवर चर्चा झाली. ”
हेही वाचा : युजर्ससाठी आनंदाची बातमी! Twitter लवकरच आणणार ‘हे’ जबरदस्त फिचर
मागच्या वर्षी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई हे भारत दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची भेट घेतली होती. सुंदर पिचाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली तेव्हाचा एक फोटो देखील ट्विटरवर शेअर करत आनंद व्यक्त केला होता.पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर कूक यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती . त्यात ते म्हणाले, ”स्वागत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. शिक्षण ते विकासकांपासून उत्पादन आणि पर्यावरणापर्यंत, आम्ही देशभर विस्तार आणि गुंतवणूक करण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
टीम कुक यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, ‘तुम्हाला भेटून आनंद झाला. विविध विषयांवर विचारांची देवाणघेवाण करणे आणि भारतात होत असलेल्या तंत्रज्ञानाशी संबंधित बदलांची माहिती शेअर करणे खूप आनंदाची बाब आहे.