Google Layoffs: जागतिक स्तरावर सुरु असलेल्या मंदीचा फटका गूगलसारख्या बड्या कंपनीलाही बसला आहे. फेसबुक, ट्विटर, मायक्रोसॉफ्ट नंतर आता गूगलने ही १२ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. एक रिपोर्टनुसार जगातील सर्वात मोठी सर्च इंजिन कंपनी गुगल पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या तयारीत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई एक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पिचाई यांनी लवकरच कर्मचारी कपात करण्याचे संकेत दिले आहेत. अशाप्रकारे Amazon आणि Meta सारख्या अमेरिकन कंपन्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी गुगलही सज्ज झाले आहे.

हेही वाचा : Google च्या २५० कर्मचाऱ्यांनी ‘या’ कारणासाठी केले ‘वॉकआऊट’

गुगलने जानेवारी २०२३ मध्ये एकूण कमर्चाऱ्यांपैकी १२, ००० कर्मचाऱ्यांची कपात केली होती. Wall Street Journal ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुंदर पिचाई म्हणाले, ”सध्या समोर असलेल्या संधींवर Google पूर्णपणे लक्ष केंद्रित करत आहे. ते पुढे म्हणाले की, अजून बरेच काम बाकी आहे.” पिचाई यांनी सूचित केले की कंपनी प्रथम महत्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करत आहे.

पिचाई पुढे म्हणाले की, या योजनेनुसार कंपनी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊ चालत आहे. अशा परिस्थितीत सर्च इंजिन कंपनीवर पुन्हा एकदा कर्मचारी कपातीचे संकट उभे राहू शकते. यापूर्वीही हजारो लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत आणि आता पिचाई यांच्या संकेतानुसार त्यात आणखी वाढ होऊ शकते. काही महिन्यांपूर्वी पिचाई यांनी कंपनीला २० टक्के अधिक कार्यक्षम बनवण्याबाबत भाष्य केले होते.

हेही वाचा : Salesforce मधून नोकरी गेल्यावर महिला कर्मचारी भावूक; पोस्ट शेअर करत म्हणाल्या, “मला सुरुवातीला…”

सुंदर पिचाई म्हणाले ते कंपनी सुधारण्यासाठी काम करत आहेत. कंपनी करत असलेल्या कामाच्या प्रत्येक पैलूवर लक्ष ठेवले जात आहे. याशिवाय कंपनी खर्च कमी करण्यासाठीही प्रयत्न करत आहे. पिचाई यांच्या म्हणण्यानुसार, काही गोष्टींमध्ये प्रगती होत आहे, परंतु अजून बरेच काम पूर्ण होणे बाकी आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या वाढत्या क्रेझबद्दल ते म्हणाले की, कंपनी या क्षेत्रातही पुढे जात आहे. हे असे क्षेत्र आहे जिथे विशेष काम करावे लागेल. कंपनी लोकांना फक्त सर्वात महत्वाच्या क्षेत्रात काम करायला लावणार आहे. तथापि, पिचाई यांना कर्मचारी कपातीच्या दुसऱ्या फेरीबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. थोडक्यात गुगलमध्ये कर्मचारी कपात होऊ सुद्धा शकते किंवा होऊ शकत नाही.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ceo sundar pichai said again more layoff in google alphabet employees soon tmb 01