देशातील Apple चे दुसरे रिटेल स्टोअर दिल्लीमधील साकेत येथे सुरु करण्यात आले आहे. सीईओ टीम कूक यांनी या स्टोअरचे उदघाट्न केले आहे. याआधी परवा टीम कुक यांनी मुंबई येथे Apple च्या पहिल्या रिटेल स्टोअरचे उद्घाटन केले. यावेळी टीम यांनी हात जोडून लोकांचे स्वागत केले होते. दिल्लीमध्ये उभारण्यात आलेले हे रिटेल स्टोअर स्टोअर सिटीवॉक मॉल इथे उभारण्यात आले आहे. हे स्टोअर १०,००० ते १२,००० स्क्वेअरफूटमध्ये उभारले आहे. आज सकाळी १० वाजल्यानंतर ग्राहक या स्टोअरमध्ये जाऊन खरेदी करू शकणार आहेत. या स्टोअरबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Apple चे देशातील दूर रिटेल स्टोअर हे दक्षिण दिल्लीमधील सिलेक्ट सिटी वॉक मॉलमध्ये तयार करण्यात आले आहे. मॉलमधील पहिल्या मजल्यावर असणारे हे स्टोअर मुंबईतील फ्लॅगशिप स्टोअरपेक्षा खूपच लहान आहे. मात्र येथे ग्राहकांना Apple ची सर्व प्रॉडक्ट्स बघायला मिळणार आहेत.

हेही वाचा : VIDEO: देशातील पहिले Apple चे रिटेल स्टोअर मुंबईत झाले सुरु, CEO टीम कुक यांनी केले ग्राहकांचे स्वागत

उद्घाटनावेळी झाली मोठी गर्दी

Apple च्या दुसरे रिटेल स्टोअर पाहण्यासाठी प्रमाणात गर्दी केली होती. टीम कुकला भेटण्यासाठी आणि Apple रिटेल स्टोअरमध्ये जाण्यासाठी लोक सकाळपासून रांगेत उभे होते. सिटी वॉक मॉलमध्ये Apple च्या साकेत स्टोअरचे उद्घाटन करण्यात आले आहे. सीईओ टिम कुक यांनी उद्घाटनानंतर लोकांची भेट घेतली. तसेच दिल्लीमधील या स्टोअरमध्ये ७० सदस्यांची टीम काम करणार आहे. ज्यामध्ये ते १५ भाषांमध्ये संवाद साधणार आहेत. ज्यामुळे खरेदीदाराला प्रॉडक्ट खरेदी करताना आपलेपणा वाटणार आहे.

Apple च्या दिल्ली येथील स्टोअरमध्ये ७० कर्मचारी काम करणार आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच मुंबईमधील स्टोअरमध्ये १०० कमर्चारी काम करणार आहेत. तिथेही महिला कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असणार आहे. हे स्टोअर तयार करताना भारतीय संस्कृती जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या स्टोअरमध्ये अनेक दरवाजे आहेत, त्यापैकी प्रत्येक दरवाजावर वेगवेगळ्या शहराबद्दल वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.