Govt Issues High Risk Security Alert For Android Users : ११ सप्टेंबर २०२४ रोजी इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने भारतातील ॲण्ड्रॉइड (Android) युजर्सच्या, डिव्हायसेसमधील अनेक असुरक्षित बाबी (vulnerabilities) अधोरेखित करून, इशारा जारी केला आहे. या अनेक असुरक्षित बाबी १२ ते १४ व्हर्जनवर परिणाम करू शकता ; ज्यामुळे जगभरातील लाखो ॲण्ड्रॉइड युजर्ससाठी धोके निर्माण झाले आहेत.
तर सल्ल्यानुसार, हॅकर्स संवेदनशील माहितीमध्ये प्रवेश करण्यासाठी, विशेषाधिकार (ॲडमिन-लेव्हल-कंट्रोल ) मिळविण्यासाठी किंवा सेवा नाकारण्यासाठी (DoS) या असुरक्षिततेचा गैरफायदा घेत, ॲण्ड्रॉइड युजर्सचे संभाव्य शोषण करू शकतात आणि त्यामुळे लक्ष्यित उपकरणे सुरळीत काम करीत असताना व्यत्ययात्मक बाबी घडू शकतात. त्यामुळे Android डिव्हायसेसचा केला जाणारा वापर लक्षात घेता, युजर्सना सुरक्षिततेबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे.
Android इकोसिस्टीममधील अनेक क्षेत्रांमधून असुरक्षात्मक बाबी उद्भवतात. त्यामध्ये ॲण्ड्रॉइड फ्रेमवर्क, सिस्टीम, गुगल प्ले सिस्टीम अपडेट्स आणि क्वालकॉम, आर्म व युनिसॉकमधील अनेक हार्डवेअर-सेप्सिफिफ कॉम्पोनंट्स घटकांमधील त्रुटी यांचा समावेश आहे. रिमोट की प्रोव्हिजनिंग सबकॉम्पोनंट्समधील Google Play सिस्टीम अपडेट अटॅकर्सचा केंद्रबिंदू आहे, असे सांगितले जात आहे. तर या सर्व गोष्टींमुळे हॅकर्स युजर्सचा वैयक्तिक डेटा चोरू शकतात, डिव्हाइस नियंत्रित (कंट्रोल) करू शकतात. तसेच अनावश्यक कार्ये (DOS अटॅक) करून सिस्टीम क्रॅशसुद्धा करू शकतात.
तुम्ही तुमच्या डिव्हाइयसचे संरक्षण कसे करू शकता?
या समस्येवर CERT-In ने सुचवले की, सर्व Android युजर्सनी जागरूक राहायला हवे आणि सिक्युरिटी अपडेट इन्स्टॉल केले पाहिजे.
हे अपडेट्स ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्सद्वारे सॅमसंग, वनप्लस, शाओमी व ओईएम्स युजर्ससाठी जारी करण्यात आले आहेत. सायबर हल्ल्यांपासून तुमच्या डिव्हाइसचे संरक्षण मजबूत करण्यासाठी हे अपडेट्स डिझाइन करण्यात आले आहेत.
अपडेट्स रोल आउट होईपर्यंत, वापरकर्त्यांना ॲप्स इन्स्टॉल करणे, अज्ञात वेबसाइट्सना भेट देणे किंवा संशयास्पद लिंक्सवर क्लिक करणे टाळण्याचा सल्ला दिला जात आहे.
तसेचअपडेट्स येईपर्यंत युजर्सना ॲप परमिशन्सवर बारीक नजर ठेवणे, वैयक्तिक डेटा शेअर करण्याबाबत सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तर लवकरच ही अपडेट्स युजर्ससाठी लागू केली जातील; जेणेकरून त्यांच्या डिव्हाइसचे संरक्षण होऊ शकेल आणि सायबर धोक्यांपासून ते सुरक्षित राहू शकतील.