सर्वसाधारणपणे इतर सर्व ऑपरेटिंग सिस्टिम्सपेक्षा आयओएस ही अॅपलची ऑपरेटिंग सिस्टिम सर्वाधिक विश्वासार्ह आणि हल्लेखोरांसाठी भेदण्यास कठीण अशी मानली जाते. मात्र अॅपल आयओएस आणि आयपॅडओएस या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिम्समध्ये काही मूलभूत त्रुटी असून त्यांचा वापर सायबर हल्लेखोरांकडून सिस्टिममध्ये घुसून महत्त्वाची खासगी माहिती मिळवण्यासाठी होऊ शकतो; परिणामी आयपॅड किंवा संबंधित उपकरण वापरताच येणार नाही, अशीही परिस्थिती या सायबरहल्ल्यामुळे उद् भवू शकते, असा इशारा (सर्ट- इन) या सरकारी यंत्रणेने दिला आहे.
आणखी वाचा : APPLE WATCH नवऱ्याने जिवंत गाडले, अॅपल वॉचने मात्र सुटका केली
सायबरहल्ल्याशी संबंधित बाबींकडे बारीक नजर ठेवण्याचे काम ‘द इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टिम’ (सर्ट- इन) (CERT-IN) या यंत्रणेकडे आहे. सीइआरटीने म्हटले आहे की, अॅपलमोबाइलफाइल इंटिग्रिटी, एव्हीइव्हिडीओ एन्कोडर, सीएफनेटवर्क, कोअरब्लूटूथ यामध्ये काही त्रुटी असून त्यांचा वापर हल्लेखोरांकडून सुरक्षाचक्र भेदण्यासाठी केला जाऊ शकतो.
आणखी वाचा : हिवाळ्यात ऊब तर उकाड्यात गारवा देणारे कापड कुणी केलेय तयार?
विशिष्ट प्रकारची फाइल वापरकर्त्यांना पाठवून ती त्यांना उघडण्यास भाग पाडून त्यामार्फत हल्लेखोर अॅपलच्या यंत्रणेत घुसखोरी करून गोपनीय माहिती चोरू शकतात, असे सीइआरटीने म्हटले आहे. त्यामुळे वापरकर्त्यांनी सर्व सिक्युरिटी अपडेटस् च्या माध्यमातून आपली सुरक्षा कडेकोट करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
सीइआरटीने दिलेल्या माहितीनुसार, खाली देण्यात आलेल्या उपकरणांच्या वापरकर्त्यांनी खास सुरक्षा काळजी घेण्याची गरज आहे-
अॅपल आयओएस १६.१ आणि आयपॅडओएस १६ च्या आधीची सर्व व्हर्जन्स
१) आयफोन ८ आणि त्याच्या नंतरची व्हर्जन्स
२) आयपॅड प्रो (सर्व मॉडेल्स)
३) आयपॅड एअर थर्ड जनरेशन व त्यानंतरची व्हर्जन्स
४) आयपॅड फिफ्थ जनरेशन व नंतरची व्हर्जन्स
५) आयपॅड फिफ्थ मिनी आणि नंतरची व्हर्जन्स