लास वेगास येथे होणाऱ्या वर्षातील सर्वात मोठ्या Consumer Eletronic Show मध्ये AMD ने शक्तिशाली मोबाईल प्रोसेसर लाँच केले असून, त्याचा लेटेस्ट सेट कार्यक्षमता आणि आणि परफॉर्मन्स यांच्यात ताळमेळ राखण्याचा प्रयत्न करतो.
BMW बदलणार ड्रायव्हरच्या मूडनुसार रंग; जाणून घ्या नक्की काय आहेत फीचर्स ?
AMD ने सुरु केलेल्या CES २०२३ मध्ये लॅपटॉप्स आणि डेस्कटॉपसाठी अनेक Ryzen ७००० आणि Radeon ७००० या मोबाईल प्रोसेसरच्या सिरीजचे लाँचिंग केले आहे. Ryzen ७०४५HX ला आतापर्यंत लाँच केलेल्या प्रोसेसरपैकी सर्वात शक्तिशाली प्रोसेसर म्हणून ओळखले जाते. हे त्याचे प्रमुख फिचर आहे. हा प्रोसेसर १६ कोअर आणि ३२ थ्रेडसह येतो. Ryzen ७०४५HX कदाचित नुकत्याच लाँच केलेल्या इंटेल कोअर i9-13980HX प्रोसेसरशी स्पर्धा करेल.