लास वेगास येथे या वर्षातील सर्वात मोठा टेक शो(CES २०२३) पार पडला. या शो मध्ये अनके प्रमुख कंपन्यांनी आपली प्रॉडक्ट्स लाँच केली आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन फीचर्स असलेले हे प्रॉडक्ट्स आहेत. तर आपण ते प्रॉडक्ट्स कोणकोणते आहेत ते पाहुयात.
L’Oréal Hapta
सौंदर्यप्रसाधने क्षेत्रातील दिग्गज L’Oreal कंपनीने HAPTA नावाचे नवीन मेकअप अॅप्लिकेशन लाँच केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार HAPTA हा एक “हँडहेल्ड कॉम्प्युटराइज्ड मेकअप अॅप्लिकेटर आहे. ज्यांच्या हाताची हालचार मर्यादित स्वरूपात आहे अशा विशेष ग्राहकांसाठी हे अॅप्लिकेटर आहे. कंपनीने त्याचे ‘ब्रो मॅजिक’, एक स्मार्ट आयब्रो अॅप्लिकेटर देखील लाँच केले आहे.
सर्वोत्तम गेमिंग उत्पादन: सोनी प्रोजेक्ट लिओनार्डो
प्रोजेक्ट लिओनार्डो हा सोनीचा गेमिंग हार्डवेअरच्या चा प्रकार आहे. हे एक कंट्रोलर किट असून, ते प्लेस्टेशन बॉक्सच्या बाहेर काम करेल. तसेच यात दोन वर्तुळाकार गेमपॅड येतात.
हेही वाचा : CES 2023: सॅमसंगने लाँच केले ‘हे’ एलईडी टीव्ही; जाणून घ्या खासियत
कॉन्टिनेंटलचे नवीन 47-इंच ऑटोमोटिव्ह डिस्प्ले
कॉन्टिनेंटलने CES 2023 मध्ये त्याचा वक्र अल्ट्रावाइड डिस्प्ले सादर केला आहे.“अल्ट्रावाइड” म्हणजे १.२९ मीटर रुंदीचा, एका ए-पिलरपासून दुसऱ्यांपर्यंत वक्र करणे. ४७.५-इंच TFT डिस्प्ले ७,६८० बाय ६६० पिक्सेल सक्रिय क्षेत्रावर ३,००० हून अधिक LEDs द्वारे प्रकाशित आहे. मॅट्रिक्स बॅकलाईट उच्च-कॉन्ट्रास्ट चित्र गुणवत्ता निर्माण करते आणि आवश्यक नसलेल्या स्क्रीनच्या वैयक्तिक भागांना मंद करण्याचा पर्याय देखील देते. हे स्थानिक डिमिंग तंत्रज्ञान वीज वाचवते.
सॅमसंग एलईडी टीव्ही
दक्षिण कोरियाची कंपनी असणाऱ्या सॅमसंगचे हे नवीन लाईनअप वापरकर्त्यांना नवीन अधिक पर्याय उपलब्ध करेल. CES २०२३ च्या आधी सॅमसंगने निओ क्यूएलईडी टीव्ही, ओएलईडी टीव्ही आणि मायक्रोएलईडी टीव्हीची नवीन रेंज जाहीर केली आहे. वीन निओ QLED मॉडेल हे ४ के आणि ८ के रिझोल्युशनमध्ये येतात. यांचा स्क्रीन ५० ते १४० इंचामध्ये येतो. तर OLED टीव्ही लाइनअपमध्ये १४४ Hz रिफ्रेश रेट आणि सॅमसंग गेमिंग हब असणार आहे.
हेही वाचा : CES 2023: AMD ने लाँच केले ‘हे’ मोबाईल प्रोसेसर; जाणून घ्या खासियत
AMD चे प्रोसेसर
Consumer Eletronic Show मध्ये AMD ने शक्तिशाली मोबाईल प्रोसेसर लाँच केले असून, त्याचा लेटेस्ट सेट कार्यक्षमता आणि आणि परफॉर्मन्स यांच्यात ताळमेळ राखण्याचा प्रयत्न करतो. AMD ने सुरु केलेल्या CES २०२३ मध्ये लॅपटॉप्स आणि डेस्कटॉपसाठी अनेक Ryzen ७००० आणि Radeon ७००० या मोबाईल प्रोसेसरच्या सिरीजचे लाँचिंग केले आहे. Ryzen ७०४५HX ला आतापर्यंत लाँच केलेल्या प्रोसेसरपैकी सर्वात शक्तिशाली प्रोसेसर म्हणून ओळखले जाते. हे त्याचे प्रमुख फिचर आहे. हा प्रोसेसर १६ कोअर आणि ३२ थ्रेडसह येतो. Ryzen ७०४५HX कदाचित नुकत्याच लाँच केलेल्या इंटेल कोअर i9-13980HX प्रोसेसरशी स्पर्धा करेल.