चांद्रयान-३ चे ‘विक्रम’ लँडर १४ जुलैला पृथ्वीच्या पृष्ठभागावरून झेपावलं होतं. यानंतर २३ ऑगस्टला ‘विक्रम’ लँडर अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरत भारताने नवा इतिहास घडवला होता. भारतीय अंतराळ संस्थेने ( इस्रो ) जाहीर केलेल्या वेळेनुसार २३ ऑगस्टला सहा वाजून चार मिनिटांनी चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं. आता ‘विक्रम’ लँडरमधून ‘प्रज्ञान’ रोव्हर बाहेर पडला असून, ‘इस्रो’नं त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

चांद्रयान-३ मोहिमेतील ‘प्रज्ञान’ रोव्हर ‘विक्रम’वरून बाहेर पडला असून, त्याने दक्षिण ध्रुवावरील चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास सुरु केला आहे. लँडर आणि रोव्हरवरील सर्व यंत्रणा सुरळीत सुरु असल्याचं ‘इस्रो’नं जाहीर केलं आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Time Moves Faster on the Moon Than on Earth
चंद्र पृथ्वीपेक्षा अधिक वेगवान?; नवीन संशोधनाने उलगडले वेळेचे रहस्य!
Sunny Deol Confirms His Role in Ramayana
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात काम करण्याबाबत सनी देओलकडून भूमिका स्पष्ट; म्हणाला, “हा चित्रपट ‘अवतार’प्रमाणे…”

हेही वाचा : Chandrayaan-3 : ISRO च्या मोहिमेचा चंद्रावरील helium 3 शी संबंध काय? हे खनिज का महत्वाचे?

‘इस्रो’नं व्हिडीओ ट्वीट करत म्हटलं की, “चांद्रयान-३ लँडरवरून रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर कसं उतरला, ते पाहा.”

दरम्यान, ‘प्रज्ञान’ रोव्हरवरील चाकांवर भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ आणि ‘इस्रो’च्या लोगोची छाप आहे. ‘इस्रो’नं शेअर केलेल्या व्हिडीओत फिकटपणे चंद्राच्या पृष्ठभागावर ही छाप उमटवताना दिसत आहे.

दरम्यान, चंद्रावरील एक दिवस ( पृथ्वीवरील १४ दिवस ) ‘विक्रम’ लँडर आणि ‘प्रज्ञान’ रोव्हरचा प्रवास सुरु राहणार आहे. तरी, चंद्रावर दुसरा दिवस ( पृथ्वीवरील १४ दिवसांनी ) उजाडल्यानंतर लँडर आणि रोव्हर पुन्हा सक्रीय होतील, अशी अपेक्षा ‘इस्रो’मधील संशोधकांना आहे.

“…तर १४ दिवसांनीही ‘प्रज्ञान’ काम करेल”

काही दिवसांपूर्वी ‘इस्रो’चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी याचं सुतोवाच केले होते. “सूर्यास्त झाल्यानंतर त्या ठिकाणी मिट्ट काळोख होतो आणि तापमान उणे १८० अंश सेल्सिअसपर्यंत खाली येते. या तापमानात उपकरणे टिकणे अवघड आहे. मात्र, ती टिकली, तर आणखी १४ दिवसांनी दिवस उजाडल्यानंतर पुन्हा एकदा ‘प्रज्ञान’ आपली मोहीम सुरु करू शकेल,” असं एस. सोमनाथ यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा : Chandrayaan 3 चंद्राकडे निघाले, मात्र चंद्राजवळ जाणारे पहिले यान कोणत्या देशाचे होते? कधी गेले होते?

‘प्रज्ञान’ काय काम करणार?

‘प्रज्ञान’ रोव्हरच्या मदतीने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील दगड, माती, विवरे यांचा अभ्यास केला जाणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरील टेकड्या आणि विवरांचं अचूनक स्कॅन करण्याचा प्रयत्न रोव्हरच्या साहाय्याने केला जाणार आहे. या परिसराची छायाचित्रे काढून त्याचा अभ्यास केला जाणार आहे.

Story img Loader