अंतराळ क्षेत्रात भारत नवनवे टप्पे पार करत आहे. चांद्रमोहिमेच्या यशानंतर भारताने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सौरमोहीम हाती घेतली आहे. भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आज सकाळी ११.५० वाजता आदित्य एल-१ हे अवकाशयान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवलं आहे. दरम्यान, चांद्रयान-३ कडून एक मोठी माहिती मिळाली आहे. प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर १०० मीटर अंतर पूर्ण केलं आहे. प्रज्ञान रोव्हर सध्या चंद्रावरील लँडिंग साईट शिवशक्ती पॉईंटपासून १०० मीटर दूरवर संशोधन करत आहे.

इस्रोने चांद्रयान-३ चा एक नवीन फोटो शेअर केला आहे. यामध्ये प्रज्ञानचा मूनवॉक दाखवण्यात आला आहे. आता चंद्रावर अंधार पडू लागला आहे. चंद्रावर जेव्हा पूर्णपणे काळोख असेल तेव्हा प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरचं काम थांबेल. कारण लँडर आणि रोव्हरवर सोलार पॅनल बसवले आहेत. त्यामुळे यावरील उपकरणं केवळ सूर्यप्रकाशातच काम करू शकतात. तसेच चंद्रावर सू्र्यास्त झाल्यानंतर तिथलं तापमान उणे २०३ अंश सेल्सिअस इतकं होईल. चंद्रावर १४ दिवस रात्र आणि १४ दिवस उजेड असतो.

wall-painted calendar in the Roman Republic
भूगोलाचा इतिहास : एका खेळियाने…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Seven stalled projects on track soon speed up land acquisition process in five projects
रखडलेले सात प्रकल्प लवकरच मार्गी, पाच प्रकल्पांतील भूसंपादन प्रक्रियेला वेग
Maharashtrachi Hasyajatra fame prithvik pratap reaction on prajakta mali phullwanti movie
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ; पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मला फुलवंती पेक्षा जास्त…”
Sun Planet Transit In Scorpio
५ दिवसांनंतर सुर्य करणार मंगळाच्या घरात प्रवेश, या राशींचे सुरु होणार चांगले दिवस, प्रत्येक कामात मिळणार यश!
tharala tar mag next epiosde arjun rescue madhubhau from the jail
ठरलं तर मग : अखेर मधुभाऊंची जेलमधून होणार सुटका! अर्जुनने कोर्टात घेतली मोठी जबाबदारी, पाहा प्रोमो
Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक

इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ शनिवारी म्हणाले, चांद्रयान-३ मधील रोव्हर आणि लँडर उत्तम काम करत आहेत. चंद्रावर आता रात्र होणार आहे. त्यामुळे यावरील उपकरणं आता निष्क्रिय होतील. सध्या तिथे रोव्हरचं काम सुरू आहे. रोव्हरद्वारे आम्हाला बरीचशी माहिती मिळाली आहे. आम्ही येत्या एक-दोन दिवसात आपल्या अवकाशयानावरील उपकरणं निष्क्रिय करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहोत, कारण दोन दिवसांत तिथे गडद अंधार पडेल.

विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरच्या माध्यमातून इस्रोला मिळणारे फोटो, व्हिडीओ आणि तिथली माहिती इस्रो सोशल मीडियावर शेअर करत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विक्रम आणि प्रज्ञानने चंद्राच्या पृष्ठभागाचे, तिथल्या खंदकांचे आणि मातीचे फोटो इस्रोच्या बंगळुरूतील मुख्यालयाला पाठवले आहेत. तसेच चंद्रावरील तापमानाची माहितीदेखील इस्रोला मिळाली आहे. त्याचबरोबर चंद्रावर पाण्याचा शोध घेतला जात आहे.

इस्रोने दोन दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत प्रज्ञान रोव्हर जागेवर गोल फिरताना दिसतोय. इस्रोने हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की सुरक्षित मार्गाच्या शोधात रोव्हर फिरवण्यात आला. प्रज्ञान रोव्हरच्या या रोटेशनचा व्हिडीओ विक्रम लँडरवरील इमेजर कॅमेऱ्याने शूट केला आहे. इस्रोने हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की, हा व्हिडीओ पाहून असं वाटतंय, चांदोमामाच्या अंगणात एखादं लहान मूल (प्रज्ञान रोव्हर) खेळतंय आणि आई (विक्रम लँडर) हे सगळं प्रेमाने पाहत आहे, तुम्हालाही असंच वाटतंय ना?