ISRO च्या Chandrayaan 3 चा चंद्राचा दिशेने अखेर प्रवास सुरु झाला आहे. खऱ्या अर्थाने चांद्रयान ३ मोहिमेतील महत्त्वाच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. १४ जुलैला चांद्रयानचे प्रक्षेपण झाले होते, गेले काही दिवस हे यान पृथ्वीच्या भोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत होते, प्रत्येक प्रदक्षिणेच्या वेळी पृथ्वीपासूनचे अंतर वाढवत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अखेर आज मध्यरात्री एका निर्णायक क्षणी चांद्रयान ३ मधील असलेल्या इंजिन सुरु करण्यात आली. जवळपास २५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ ही इंजिन सुरु होती. यामुळे यानाला वेग मिळाला, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा फायदा घेत हा वेग इतका वाढवला गेला की यान पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती भेदत चंद्राच्या दिशेने निघाले आहे. आता चंद्राच्या जवळ पोहचपर्यंत चार दिवसांचा कालावधी चांद्रयान ३ ला लागणार आहे. चंद्राजवळ जाण्याचा इस्रोचा हा तिसरा प्रयत्न असणार आहे. चांद्रयान १ आणि २ मोहिमेत चंद्राच्या कक्षेत पोहचण्यात इस्रोला यश मिळाले होते.

हेही वाचा… Chandrayaan 3 च्या निर्णायक प्रवासाला सुरुवात, चंद्राच्या कक्षेत कधी पोहचणार?

आत्तापर्यंत चंद्राजवळ एकूण ११ देशांचे उपग्रह पोहचले आहेत, पण चंद्राजवळ पोहचवण्याचा आणि जवळून जाण्याचा पहिला मान हा सोव्हिएत रशियाकडे जातो.

चंद्राजवळून जाणारे पहिले यान Luna 1

अमेरिका आणि सोव्हिएत रशियामध्ये १९५७ ला अवकाश स्पर्धा सुरु झाली आणि विविध अवकाश मोहिमांचा सपाटा दोन्ही देशांकडून सुरु झाला. यामध्ये चंद्राजवळ पहिलं पोहचण्याचा प्रयत्न दोन्ही देशांकडून केला जात होता.

हेही वाचा… ISROच्या प्रक्षेपकाचे अवशेष ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर?

रशियाने Luna 1 नावाचा उपग्रह हा २ जानेवारी १९५९ ला प्रक्षेपित केला. सुमारे ३६० किलोग्रँम वजनाचा हा उपग्रह ४ जानेवारीला चंद्रापासून सहा हजार किलोमीटर अंतरापासून गेला. खरं तर चंद्रावर आदळण्यासाठी या मोहिमेचे नियोजन केले होते. या निमित्ताने चंद्रावर यानाच्या रुपाने पहिलं मानवी अस्तित्व उमटवण्याचा रशियाचा प्रयत्न होता. मात्र उपग्रहातील काही तांत्रिक बिघाडामुळे दिशा चुकली आणि चंद्रावर न आदळता चंद्रापासून काही अंतरावरुन हा उपग्रह निघून गेला.

दोन दिवसांनी त्यामधील बॅटरी संपल्याने त्याचा पृथ्वीवरील यंत्रणांशी असलेला संपर्क तुटला. तेव्हा चंद्राजवळ पोहचण्याचा पहिला मान Luna 1 या उपग्रहाने मिळवला. एवढंच नव्हे तर पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती भेदत पृथ्वीपासून दूर जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू म्हणूनही Luna 1 या उपग्रहाची नोंद झाली आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrayaan 3 started his journey towards moon but do you know name of first spacecraft satellite that reached near moon soviet russia luna 1 asj