ISRO Chief Update About Chandrayaan 3 Vikram Lander: माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त रामेश्वरममध्ये डॉ. ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सोमनाथ यांनी भेट दिली होती. यावेळी सोमनाथ यांनी इस्रोची आगामी मोहिम, चांद्रयान-३ च्या विक्रम लॅण्डरविषयी अपडेट दिला आहे. सोमनाथ यांच्या माहितीनुसार विक्रम सध्या काय करतो याविषयी जाणून घेऊया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग करणाऱ्या चांद्रयान-3 या अंतराळयानाच्या विक्रम लँडरविषयी एस. सोमनाथ यांनी अपडेट दिला आहे. सध्या विक्रम लॅण्डरकडून वैज्ञानिकांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळू शकला का, या प्रश्नावर ते म्हणाले की, “चंद्रावरील दिवसाच्या कालावधी दरम्यान (पृथ्वीवर १४ दिवसांचा कालावधी) विक्रमने आपले काम चांगले केले आहे. आणि आता तो चंद्रावर आनंदाने झोपी गेला आहे. भविष्यात जर चंद्रावर झोपी गेलेल्या विक्रमला जागे व्हावे असे वाटत असेल तर तो तेव्हा जागा होईलच, तोपर्यंत आम्ही वाट पाहू, ”

२३ ऑगस्ट रोजी ऐतिहासिक लँडिंग केल्यानंतर, लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फरची उपस्थिती शोधणे आणि तापमान रेकॉर्ड करणे अशी महत्त्वपूर्ण कामे विक्रमने केली होती. चंद्रावर रात्र सुरू झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये स्लीप मोडमध्ये आणल्यानंतर रोव्हर प्रज्ञान आणि लँडर विक्रम यांच्याशी संवाद पुन्हा स्थापित करण्यासाठी इस्रोने प्रयत्न केले होते मात्र त्यांच्याकडून कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरूच राहतील,” असे इस्रोने सांगितले होते.

हे ही वाचा<< चांद्रयान- ३ च्या वेळी इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांना नासाने दिली होती ‘ही’ ऑफर! उत्तर वाचून वाटेल अभिमान

ISRO चं आता मिशन शुक्र..

दुसरीकडे, इस्रोच्या अंतराळ संशोधनच्या संबंधित आगामी मोहिमांविषयी माहिती देताना सोमनाथ म्हणाले, “अनेक शोध मोहिमा राबवण्याचा आमचा विचार व प्रयत्न आहे. मंगळ, शुक्र आणि पुन्हा कधीतरी चंद्रावर जाण्याची आमची योजना आहे. पृथ्वीच्या हवामानाच्या पट्ट्याजवळील तापमान आणि हवामान यांचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा नियोजन सुरु आहे. याशिवाय सॅटेलाईट संपर्काच्या संबंधित नियमित कामे सुरूच आहेत. “

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrayaan 3 vikram lander will awake when he wants isro chief update about indias latest space mission in coming days svs