भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष इस्रोच्या चांद्रयान-३ या मोहिमेवर लागलं आहे. चांद्रयान-३ मोहिमेतील लँडर २३ तारखेला संध्याकाळी चंद्रावर उतरणार आहे. त्यापूर्वी चांद्रयान-२ ने चांद्रयान-३ चे स्वागत केलं आहे. चांद्रयान-२ आणि चांद्रयान-३ चा संपर्क झाल्याची माहिती, इस्रोने ट्वीट करत दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इस्रोने ट्वीटमध्ये म्हटलं, “स्वागत आहे मित्रा… चांद्रयान २ च्या ऑर्बिटरने चांद्रयान-३च्या लँडरचं स्वागत केलं आहे. दोघांमध्ये द्विपक्षीय संवाद प्रस्थापित झाला आहे. आता लँडरशी संपर्कांत राहण्याचे आणखी मार्ग तयार झाले आहेत. लँडिगचे प्रक्षेपण बुधवारी सायंकाळी ५.२० वाजता सुरु होईल.”

हेही वाचा : रशियाचे लुना-२५ कोसळले; चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणे इतके कठीण आहे का?

२०१९ साली चांद्रयान-२ चे लँडर चंद्रावर उतरताना कोसळलं होतं. पण, चांद्रयान-२ चे ऑर्बिटर चार वर्षापासून चंद्राच्या भोवती फिरत आहे. चांद्रयान-२ च्या ऑर्बिटरने चांद्रयान-३च्या मोहिमेसाठी मदत केली आहे.

हेही वाचा : चांद्रयान ३ चंद्रावर उतरताना कधी व कुठे पाहाल? वेळ जाणून घ्या

दरम्यान, चांद्रयान-३ चा ‘विक्रम’ हा लँडर त्यांच्या अंतिम कक्षेत ( २५ बाय १३४ किमी ) यशस्वीरीत्या स्थापित झाला आहे. आता २३ तारखेला त्याच्या उतरण्याच्या ठिकाणी सुर्योदय होण्याची प्रतीक्ष आहे. त्यादिवशी अंदाजे ५.४५ वाजता चंद्रावर उतरण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल. ६.०४ वाजता विक्रम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉप्ट लँडिंग करेल, असं इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं.