गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ओपनएआय कंपनीने आपला ChatGpt हा चॅटबॉट लॉन्च केला आहे. सध्या अनेक क्षेत्रांमध्ये याचा वापर करण्यात येत आहे. ChatGPT लॉन्च झाल्यापासून त्याने टेक क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडवून दिली आहे. ChatGPT लॉन्च झाल्यामुळे त्याच्याशी स्पर्धा करण्यासाठी अनेक कंपनी आपला स्वतःचा AI चॅटबॉट तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गुगलने बार्ड आणि मायक्रोसॉफ्टने बिंग असे आपले AI चॅटबॉट लॉन्च केले आहेत.

मात्र ओपनआयने लॉन्च केलेले AI टूल हे अधिक शक्तिशाली, स्मार्ट आणि डेव्हलप आहे. याच्या नवीन अपडेटमध्ये लोकप्रिय AI चॅटबॉटला हिंदी आणि अनु भारतीय भाषांमध्ये प्रतिसाद देण्याची क्षमता मिळते. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे. ChatGpt हा एक कृत्रिम AI आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. सध्या ते इंग्रजी भाषेवर काम करते. हे भविष्यात इतर भाषांमध्ये जोडले जाऊ शकते.OpenAI ने अलीकडेच ChatGpt – 4 लॉन्च केले आहे. जे आधीच्या चॅटबॉटपेक्षा अधिक प्रगत असल्याचा दावा केला जात आहे.

maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Raj Thackeray in Borivali
Raj Thackeray in Borivali : राज ठाकरेंना भर सभेत आला कॉल, मुंबईतील एक सभा अचानक रद्द; नेमकं काय झालं?
Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
Uddhav Thackeray on Gadgebaba
Uddhav Thackeray : “संत गाडगेबाबा घरी यायचे, दरवाजाबाहेर उभं राहून…”, उद्धव ठाकरेंनी सांगितला आजोबांच्या काळातील आठवण
Narendra modi Rahul Gandhi Bal Thackeray
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं मविआ नेत्यांना आव्हान; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींकडून…”
narendra modi criticized congress rahul gandhi
“संविधानाच्या नावाखाली लाल पुस्तकं छापून काँग्रेसने…”; नांदेडच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!
Uddhav Thackeray Narendra Modi (4)
“…तर मी या निवडणुकीतून माघार घ्यायला तयार आहे”; उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना आव्हान!

हेही वाचा : Amazon Prime Day Sale: अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलच्या तारखा जाहीर; ‘या’ २५ शहरांमध्ये मिळणार…, जाणून घ्या

ChatGPT मधील नवीन अपडेटमुळे भारतामध्ये राहणारे नागरिक त्याना सोयीस्कर असलेल्या भाषेमध्ये AI चॅटबॉट वापर करू शकणार आहेत. मात्र चॅटजीपीटीचा वापर हिंदी किंवा तुम्हाला सोयीस्कर असलेल्या भाषेमध्ये कसा करायचा? त्याआधी हे लक्षात घेणे आवश्यक आहे ChatGpt सध्या काहीचं भारतीय भाषांमध्ये सपोर्ट करतो. आता ChatGPT वापरून हिंदीमध्ये प्रतिसाद कसा मिळवायचा ते जाणून घेऊयात.

ChatGPT मध्ये हिंदी प्रतिसाद कसा मिळवायचा ?

१. सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या क्रेडेन्शिअल्ससह ChatGPT लॉग इन करा.

२. जर का तुमचे ChatGPT वर अकाउंट नसेल तर तुमचा ईमेल आयडी वापरून अकाउंट ओपन करावे.

३. अकाउंट ओपन झाले किंवा लॉग इन केल्यावर तुम्हाला विचारायचा असलेला प्रश्न टाईप करावा.

४. प्रश्न टाईप केल्यानंतर तुम्हाला हिंदीमध्ये उत्तर हवे आहे असे तिथे प्रविष्ट करा.

५. यामधील एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचा प्रश्न हिंदीमध्ये विचारल्यास चॅटबॉट त्याच भाषेत उत्तर देईल.

त्याचप्रमाणे ChatGpt बंगाली, भोजपुरी, आसामी आणि इतर अनेक भारतीय भाषांमध्ये प्रतिसाद देऊ शकते.

हेही वाचा : ChatGpt वरील हिस्ट्री डिलीट करायची आहे ? जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स

ChatGPT वर साइन अप कसे करावे?

१. सर्वात प्रथम https://chat.openai.com/auth/login वर क्लिक करावे.

२. वरील लिंकवर क्लिक केल्यानंतर साइन अप करावे.

३. तुम्ही Google, Apple आणि Microsoft ID सह लॉग इन करू शकता.

४. तुमचा ईमेल आयडी निवडा / टाईप करावा. पासवर्ड टाकावा.

५. त्यानंतर तुम्ही ChatGpt मध्ये लॉग इन कराल. यामध्ये कोणतीही प्रतीक्षा यादी नाही. हा चॅटबॉट सर्वांसाठी उपलब्ध आहे.

OpenAI ने अलीकडेच Android तसेच iPhone वापरकर्त्यांसाठी ChatGPT मोबाईल अ‍ॅप लॉन्च केले आहे.