गेल्या वर्षी OpenAI ने आपला ChatGpt हा AI चॅटबॉट लॉन्च केला आहे. ओपनएआयद्वारे ChatGPT आता App च्या स्वरूपात उपलब्ध आहे. मात्र सध्या ते फक्त अमेरिकेतील iPhones वापरकर्त्यांसाठीच. एक ब्लॉग पोस्टमध्ये कंपनीने असे नमूद केले, सध्या हे अ‍ॅप अमेरिकेतील आयफोन वापरकर्त्यांनाच वापरता येणार आहे. त्यानंतर लवकरच इतर देशांमधील आयफोन वापरकर्त्यांना यामध्ये प्रवेश मिळणार आहे. iOS नंतर लवकरच अँड्रॉइड वापरकर्त्यांना देखील या अ‍ॅपमध्ये प्रवेश मिळणार आहे.

iOS साठी चॅटजीपीटी App व्हॉइस इनपुटची देखील परवानगी देते. जे व्हिस्परच्या मदतीने तयार केले गेले आहे. जी एक ओपन सोर्स भाषण ओळखणारी सिस्टीम आहे. ChatGPT Plus चे सबस्क्रायबर्स आपल्या आयफोनमधून या App चा लाभ घेऊ शकणार आहेत. आतापर्यंत ChatGPT अँड्रॉइड आणि आयओएस स्मार्टफोनवर वापरण्यास उपलब्ध होते. याबाबतचे वृत्त इंडिया टूडे ने दिले आहे.

raj thackeray switzerland incident
“ए आजी तुला बोललो ना…”; राज ठाकरेंनी सांगितला स्वित्झर्लंडमधील भन्नाट किस्सा!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Raj Thackeray
Raj Thackeray in Nashik : “निवडणुका म्हणजे तुम्हाला सांगतो…”, प्रचारसभांना कंटाळून राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
raj thackeray latest news
काँग्रेसबरोबर युती करण्यावरून राज ठाकरेंची पुन्हा उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले, “मी, माझा स्वार्थ, माझी खुर्ची अन्…”
Aditya Thackeray Dhruv Rathee
Aditya Thackeray : मतदानाआधी ध्रुव राठीचं महाराष्ट्रातील नेत्यांना खुलं आव्हान, आदित्य ठाकरे तयार; म्हणाले, “हे पण…”
Uddhav Thackeray
कोकणातीन सभेतून उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंवर हल्लाबोल; दीपक केसरकरांनाही केलं लक्ष्य; म्हणाले…
raj thackeray criticized uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंच्या हातून पैसा सुटत नाही, बॅगेत काय असणार?” राज ठाकरेंची खोचक टीका!
bird was happy to see the little girl
चिमुकलीला पाहून पक्षी झाला खूश; एकमेकांची करू लागले नक्कल अन् … पाहा खेळकर पक्ष्याचा VIRAL VIDEO

हेही वाचा : सॅमसंगची Crystal 4K iSmart UHD TV सिरीज भारतात लॅान्च; क्रिस्टल टेक्नॉलॉजीसह मिळणार…, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स एकदा पाहाच

मात्र वापरकर्त्यांना हे केवळ chrome किंवा Safari सारख्याच ब्राऊझरवरूनच वापरता येत होते. आता आयफोन वापरकर्ते Apple App स्टोअरद्वारे देखील Chatgpt App डाउनलोड करू शकतात. अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी जेव्हा हे रोलआऊट होईल तेव्हा ते देखील गुगल प्ले द्वारे डाउनलोड करण्यास सक्षम असणार आहेत. आयफोनवर जर का ChatGpt App वापरायचे असेल तर वापरकर्त्यांकडे आयफोनची iOS 16.1 व त्यावरील सिरीज असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Meta ची कर्मचारी कपातीची नवीन फेरी लवकरच सुरू होणार; यावेळी ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ

OpenAI ने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले, ” आम्ही अमेरिकेमध्ये chatgpt App रोलआऊट करत आहोत आणि येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये अन्य देशांमध्ये याचा विस्तार करू. वापरकर्ते App चा वापर कसे करतात हे पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आम्ही ChatGPT मध्ये सारखे फिचर आणि सुरक्षितता यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रतिबद्ध आहोत. आयओएससाठी ChatGpt App सह आम्ही अत्याधुनिक संशोधनाला उपयुक्त साधनांमध्ये रूपांतरित करून आमच्या ध्येयाकडे आणखी एक पाऊल पुढे टाकत आहोत. ”