सध्या टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये खूप मोठ्या घडामोडी सुरू आहेत. जागतिक आर्थिक मंदीमुळे अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. तसेच मायक्रोसॉफ्टने भारतामध्ये आपला नवीन AI चॅटबॉट लॉन्च केला आहे. चॅटजीपीटीमध्ये अनेक नवीन अपडेट येत आहेत. तसेच अनेक स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स, टीव्ही अशी प्रॉडक्ट्स लॉन्च होत आहेत. आज आपण मागील आठवड्यामध्ये टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये काय-काय घडामोडी झाल्या आहेत ते जाणून घेणार आहोत.

मायक्रोसॉफ्टने लॉन्च केला ‘जुगलबंदी’ चॅटबॉट

मायक्रोसॉफ्ट कंपनीने भारतामध्ये आपला ‘जुगलबंदी’ या AI चॅटबॉटचे लॉन्चिंग केले आहे. हा AI चॅटबॉट भारतात ग्रामीण भागांमध्ये राहणाऱ्या लोकांपर्यंत सरकारी योजना सहजपणे पोहोचवण्यासाठी मदत करणार आहे. या चॅटबॉटला मायक्रोसॉफ्ट रिसर्च आणि सरकार समर्थित AI4Bharat च्या मदतीने विकसित करण्यात येत आहे. जे आयआयटी मद्रास आणि OpenNyAI वर आधारित एक ओपन सोर्स भाषेचे AI केंद्र आहे. एखाद्याला WhatsApp नंबरवर टेक्स्ट किंवा ऑडिओ मेसेज पाठवावा लागतो ज्यामुळे चॅटबॉट सुरु होतो असे Microsoft ने स्पष्ट केले. AI4Bharat स्पीच रेकग्निशन मॉडेल वापरून मेसेजला टेक्स्टमध्ये ट्रांसक्रिप्ट केले जाते. त्यानंतर AI4Bharat द्वारे प्रशिक्षित करण्यात आलेल्या भाषेच्या भाषांतर मॉडेलद्वारे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन केले जाते.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Flipkart Cancellation Fee Rule Charges
Flipkart Cancellation Fee : ऑनलाइन ऑर्डर रद्द करताच पैसे द्यावे लागणार? फ्लिपकार्टचा ‘हा’ नियम जुना, वाचा कंपनी काय म्हणते
process of regularizing project affected constructions gained momentum after return of mahayuti government
गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात
Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
Viral video of a man fell into boiled water shocking video on social media
VIDEO: उकळत्या पाण्याच्या टोपात पडला अन्…, माणसाबरोबर पुढे जे घडलं ते पाहून काळजाचा चुकेल ठोका
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…

हेही वाचा : मायक्रोसॉफ्टने भारतात लॉन्च केला ‘जुगलबंदी’ चॅटबॉट; ChatGpt ला देणार टक्कर, ग्रामीण भागांमधील लोकांपर्यंत….

WhatsApp वर शेअरवर आले नवीन फिचर

WhatsApp च्या या फीचरच्या माध्यमातून एका वापरकर्त्याला आपली स्क्रीन दुसऱ्या वापरकर्त्याशी शेअर करता येणार आहे. कंपनी वापरकर्त्यांसाठी स्क्रीन शेअरिंग आणि टॅबच्या प्लेसमेंटसंदर्भात नेव्हिगेशन बारमध्ये फीचर लॉन्च करणार आहे. स्क्रीन शेअरिंग हे एक असे फीचर आहे जे झूम, गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आणि स्काईप सारख्या अ‍ॅप्सवर देखील दिले जाते. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन स्क्रीन शेअरिंग फीचरबद्दल बोलायचे झाल्यास वापरकर्ते व्हिडीओ कॉलच्या दरम्यान त्यांची स्क्रीन शेअर करू शकणार आहेत. हे फिचर व्हिडीओ कॉल सुरु असतानाच वापरता येणार आहे. व्हिडीओ कॉल केला की खालील स्क्रीनवर हा पर्याय दिसणार आहे. 

Tecno ने लॉन्च केली Camon 20 सिरीज

Tecno एक मोबाईल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन फीचर्स असलेले मोबाईल लॉन्च करत असते. कंपनीने आपली आणखी एक नवीन सिरीज लॉन्च केली आहे. कंपनीने आपली Tecno Camon 20, Camon 20 Pro आणि Camon 20 Pro 5G हे तीन फोन या सिरीज अंतर्गत लॉन्च केली आहे. Tecno Camon 20 सिरीजमधील स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना ६.६७ इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळतो. ज्याचा ब्राईटनेस हा ५०० नीट्स इतका असू शकतो. फोनमध्ये इनबिल्ट फिंगरप्रिंट सेन्सर आणि IP53 इतके रेटिंग देण्यात आले आहे. तीनही स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आला आहे.

हेही वाचा : VIDEO: Tecno ने लॉन्च केले Camon 20 सिरीजमधील ‘हे’ तीन तगडे स्मार्टफोन्स, ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि…

भारतात लॉन्च झाले ChatGpt अ‍ॅप

गेल्या वर्षी OpenAI ने आपला ChatGpt हा AI चॅटबॉट लॉन्च केला आहे. ओपनएआयद्वारे ChatGPT आता App च्या स्वरूपात उपलब्ध आहे. App लॉन्च करण्यात आले तेव्हा ते फक्त अमेरिकेतील आयफोन वापरकर्त्यांसाठीच उपलब्ध देण्यात आले होते. chatgpt चे अ‍ॅपचा विस्तार आता ११ अतिरिक्त देशांमध्ये करण्यात आला आहे.  iOS नंतर लवकरच अँड्रॉइड वापरकर्त्यांना देखील या अ‍ॅपमध्ये प्रवेश मिळणार आहे. OpenAI च्या २६ मे च्या घोषणेनुसार ChatGPT चे App आता अमेरिका, इंग्लंड, भारत, अल्बेनिया, क्रोएशिया, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड, जमैका, कोरिया, न्यूझीलंड.तसेच निकाराग्वा, नायजेरिया, अल्जेरिया, अर्जेंटिना, अझरबैजान, बोलिव्हिया, ब्राझील, कॅनडा, चिली, कोस्टा रिका, इक्वेडोर, एस्टोनिया, घाना, इराक, इस्रायल, जपान, जॉर्डन, कझाकस्तान, कुवेत, लेबनॉन, लिथुआनिया, मॉरिटानिया, मॉरिशस, मेक्सिको, मोरोक्को, नामिबिया, नौरू, ओमान, पाकिस्तान, पेरू, पोलंड, कतार, स्लोव्हेनिया, ट्युनिशिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांमध्ये आयफोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असणार आहे.

Airtel चे सिम अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी वापरकर्त्यांना ‘हा’ मिनिमम रिचार्ज करावा लागणार

भारती एअरटेल ही देशातील दुसरे सर्वात मोठे टेलिकॉम ऑपरेटर आहे. रिलायन्स जिओ नंतर एअरटेलने आपले ५ जी नेटवर्क सुरू केले आहे.  या प्लॅनसह, वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि एकूण ३०० एसएमएससह एकूण 1GB डेटा मिळतो. फ्री हेलोट्यून्स आणि विंक म्युझिक फ्रीचे अतिरिक्त फायदे आहेत. या प्लॅनची वैधता फक्त २४ दिवस आहे. जर का तुम्हाला २८ दिवसांची वैधता असणारा प्लॅन हवा असेल तर तुम्ही १७९ रुपयांचा प्लॅन घेऊ शकता. यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिं, ३०० एसएमएस आणि २ जीबी डेटा मिळतो.

शाओमीने लॉन्च केला Civi 3 स्मार्टफोन

Xiaomi एक लोकप्रिय मोबाईल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन स्मार्टफोन लॉन्च करत असते. शाओमी कंपनीने आपला Xiaomi Civi 3 हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 8200 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. Xiaomi Civi 3 मध्ये वापरकर्त्यांना ६.५५ इंचाचा फुल एचडी प्लस OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रिझोल्युशन २४०० x १०८० पिक्सल इतके आहे. तसेच रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. या फोनच्या डिस्प्लेला कॉर्निंग गोरिला ग्लासचे प्रोटेक्शन मिळते.  Xiaomi Civi 3 च्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत CNY २,४९९ (२९,३०० रुपये) आहे. तसेच १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी व्हेरिएंटची किंमत CNY २,६९९ (सुमारे ३१,६०० रुपये) आणि १६ जीबी रॅम आणि १ टीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY २,९९९ (सुमारे ३५,२०० रुपये) इतकी आहे. हा फोन सध्या कंपनीने चीनमध्ये लॉन्च केला आहे. हा फोन वापरकर्ते dventure Gold, Coconut Grey, Mint Green आणि Rose Purple खरेदी करू शकतात.

Ola ने आपल्या ‘या’ प्रोजेक्टवर सुरू केले काम

ओला इलेक्ट्रिक कंपनी इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करते. या कंपनीने भारतातील आपल्या पहिल्या सेल गिगाफॅक्टरीवर काम सुरू केले आहे. याबद्दल ओला इलेक्ट्रिक या इलेक्ट्रिक वाहन निर्मात्याने शुक्रवारी माहिती दिली. ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विट करत सांगितले की कंपनीने आपल्या पहिल्या सेल गिगाफॅक्टरीवर काम करण्यास सुरुवात केली आहे. ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी दावा केला,” हा भारतातातील सर्वात मोठा आणि जगातील सर्वात मोठ्या सेल कारखान्यांपैकी एक असेल.” अग्रवाल यांनी केलेल्या ट्विटमध्ये प्लांटमध्ये काम करत असणाऱ्या कामगारांचा व्हिडीओ आणि फोटोदेखील त्यांनी शेअर केले आहेत. ओला इलेक्ट्रिक आपल्या पहिल्या सेल गिगाफॅक्टरीवर काम करत असल्याचे अग्रवाल यांचे ट्विट अशा वेळी आले आहे की, एलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी भारतात स्वतःचा कारखाना सुरु करण्यासाठी भारत सरकारशी चर्चा करत आहे. याबाबतचे वृत्त बिझनेस टूडे ने दिले आहे.

हेही वाचा : Reliance Jio ने फॅमिलीसाठी लॉन्च केला ‘हा’ जबरदस्त प्लॅन; ३० दिवसांच्या ट्रायलसह मिळणार…

Reliance Jio ने फॅमिलीसाठी लॉन्च केला नवीन प्लॅन

रिलायन्स जिओ संपूर्ण कुटुंबासाठी एक पोस्टपेड प्लॅन घेऊन आली आहे.Reliance Jio ने आपल्या ग्राहकांसाठी ३९९ रुपयांचा फॅमिली पोस्टपेड प्लॅन आणला आहे. या किंमतीमध्ये दुसरी कोणतीही टेलिकॉम कंपनी फॅमिली पोस्टपेड प्लॅन ऑफर करत नाही. एवढेच नाही तर यूजर्स या प्लॅनवर ३० दिवसांची ट्रायल देखील घेऊ शकतात. इथे दिलेली प्लॅनची रक्कम ही टॅक्सशिवाय दिलेली रक्कम आहे. याबाबतचे वृत्त Telecom Talk ने दिले आहे.

बिल गेट्स यांनी वाढत्या AI स्पर्धेबाबत मोठं विधान

नुकत्याच एका कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांनी AI Tech शी संबंधित भविष्यवाणी केली आहे. Goldman Sachs आणि SV Angel यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बिल गेट्स यांनी “AI च्या उदयाचा प्रभाव ई-कॉमर्स व्यवसायांवर पडणार आहे. जो कोणी ही स्पर्धा जिंकेल, त्याला खूप फायदा होईल. कारण लोक भविष्यात कोणतीही गोष्ट साइटवर शोधणार नाहीत. ते शॉपिंगसाठी Amazon वर जाणार नाहीत”, असे म्हटले होते.. ते पुढे म्हणाले, AI मुळे ग्राहकांच्या वर्तनामध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो. टॉप आर्टिफिशियल इंटेलिजन्स एजंट्समुळे लवकरच सर्च इंजिन, प्रोडक्टिव्हिटी आणि ऑनलाइन शॉपिंग साईट्ससमोर आव्हान निर्माण होणार आहे. काही दिवसांमध्ये लोक सर्च करण्यासाठी सर्च साइटवर जाणार नाहीत. ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी त्यांना अ‍ॅमेझॉनसारख्या वेबसाइट्सची गरज भासणार नाही. एक नवीन डिजिटल एजंट मुख्य प्रवाहात येण्यासाठी थोडा कालावधी लागू शकतो.

Google बंद करणार युट्यूबचे ‘हे’ प्रसिद्ध फिचर

यूट्यूब (YouTube) क्रिएटर्ससाठी महत्त्वाची माहिती आहे. या पॉप्युलर व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर एक फिचर बंद होणार आहे, पुढील महिन्यात २६ जूनपासून युट्युब स्टोरीजचा( YouTube Stories ) पर्याय बदं होणार आहे. एका ब्लॉग पोस्टमध्ये कंपनीने ही माहिती दिली आहे. युट्युबने सांगितले की ज्या स्टोरीज २६ जूनच्या आधी लाइव्ह आहे ते शेअर केलेल्या तारखेच्या ७ दिवसांनतर बंद होऊ शकतात. २६ जूनपासून कोणत्याही युट्यब क्रिएटरला स्टोरीजचा(Stories) पर्याय मिळणार नाही.

गुगलची मालकी असलेली युट्य़ुबने सन २०१७मध्ये युट्युब स्टोरीज फीचरची सुरुवात केली होती. त्यासाठी क्रिएटर आपले मोठे व्हिडिओज प्रमोट करत आहे. ब्लॉग पोस्टमुळे हे देखील समजले आहे की कंपनी व्हिडिओसंदर्भात दुसऱ्या पद्धतीने युट्यूब शॉर्ट्स, लाइव्ह इत्यादीवर लक्ष्य केंद्रीत करू इच्छित आहेत. युटयुबने असे सांगितले की. या मुख्या वैशिष्ट्यांना प्राथमिकता देण्यासाठी स्टोरीजला बंद करावे लागेल. युट्युबने कॉन्टेंट क्रिएटरर्सला सांगितले की ते कम्युनिटी पोस्ट आणि युट्युब शॉर्ट्सवर आपला फोकस करू शकतात.

Story img Loader