गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ओपनएआय कंपनीने आपला AI चॅटबॉट ChatGpt लॉन्च केला आहे. हा एक कृत्रिम चॅटबॉट आहे. सध्या चॅटजीपीटीचा वापर हा अनेक ठिकाणी केला जात आहे. सध्या या ओपनआय कंपनी नोकरी देण्यासाठी काही नवीन प्रतिभांचा शोध घेत आहे. ओपनएआय कंपनीच्या एका व्यक्तीने उपलब्ध जागा आणि आवश्यक कौशल्ये यांची व्यापक झलक दिली आहे. ज्या लोकांना कोडिंग, मशिन लर्निंग आणि इतर गोष्टींचे चांगले ज्ञान आहे त्यांना वार्षिक वेतन ३.७ कोटी इतके मिळू शकते. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
ओपनएआयमध्ये सुपरअलाइनमेंटचे प्रमुख म्हणून काम करत असलेले Jan Leike यांनी “द 80,000 तास पॉडकास्ट” च्या एका भागामध्ये चर्चेदरम्यान उघड केले की सध्या कंपनींत अनेक संशोधन आधारित पदे उपलब्ध आहेत. Leike यांनी पुष्टी केली की कंपनी अनेक इंजिनिअर्स, संशोधन शास्त्रज्ञ आणि संशोधन व्यवस्थापकांना नियुक्त करण्याचा विचार करीत आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.
उमेदवाराच्या स्किल्सबाबत बोलताना Leike यांनी सांगितले, नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कोडिंगचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. मशीन लर्निंगचे ज्ञान आणि महत्वाच्या विचारांसाठी प्रात्यक्षिक योग्यता असणे आवश्यक आहे. तथापि, हे गुण कितीही प्रभावशाली असले तरी ते समीकरणाचा एक भाग आहे. AI ची सुरक्षितता वाढवण्यासाठी प्रामाणिक वचनबद्धतेची देखील आवश्यकता आहे असे Leike म्हणाले.
ओपनएआयच्या सुपरअलाइनमेंट टीममध्ये रिचर्स करणाऱ्या इंजिनिअर्सना सुरक्षा संशोधनासाठी क्लिष्ट प्रयोगांची रचना आणि अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार धरले जाईल. या जाबदारीच्या नोकरीत त्यांना $२४५,००० म्हणजेच सुमारे २ कोटी , ते $४५०,००० म्हणजेच सुमारे ३.७ कोटी इतका वार्षिक पगार मिळेल. तसेच काही अतिरिक्त फायदे देखील यात समाविष्ट आहे. उमेदवार हे सर्व OpenAI च्या करिअर पेजवर पाहू शकतात.
कंपनीत नोकरी लागल्यास रिसर्च करणाऱ्या इंजिनिअर्सचे काम मशीन लर्निंग प्रशिक्षणासाठी कोड तयार करणे, प्रायोगिक डेटासेटचे कुशल व्यवस्थापन करणे आणि काही समस्या निर्माण झाल्यास त्याचे निराकरण करणे हे असणार आहे.