Fake ChatGPT Apps: आजकाल ChatGPTची मोठी क्रेझ पाहायला मिळते. तरुणांना नव्या A.I. तंत्रज्ञानाने अक्षरशः वेड लावल्याचे पाहायला मिळते. असंख्य लोक चॅटजीपीटीचा वापर करत आहेत. OpenAI च्या अधिकृत चॅटजीपीटी वेबसाइटवरुन तसेच अॅपस्टोरमधून A.I. तंत्राचा वापर करता येतो. पण काहीजणांना हे चॅटजीपीटी अॅप शोधणे कठीण जात आहे. या परिस्थितीचा फायदा घेत फेक चॅटजीपीटी अॅप्सचा वापर करुन लोकांची फसवणूक केली जात आहे. हे नकली अॅप सुरु केल्यानंतर त्यातील सिस्टीम लोकांना त्यांची खासगी माहिती विचारते. या माहितीचा वापर करुन वापरकर्त्यांच्या बॅंक खात्यातील पैसे काढले जातात.
सध्या अनेक फेक चॅटजीपीटी अॅप पाहायला मिळत आहेत. ठराविक माहिती भरल्याशिवाय ते अॅप सुरुच होत नाही असेही म्हटले जाते. संवेदनशील खासगी माहिती देण्यापूर्वी थोडा सारासार विचार करणे फायदेशीर ठरु शकते. या Fake ChatGPT Apps पासून वाचण्यासाठी काय करणे आवश्यक आहे याची माहिती आम्ही देणार आहोत.
Developers ची माहिती मिळवा.
Open AI हे चॅटजीपीटीचे एकमेव डेव्हलपर आहेत. सोप्या शब्दात ओपन ए.आय. व्यतिरिक्त अन्य कोणतीही कंपनी चॅटपीजीटीची निर्मिती करत नाही. जर तुम्ही गुगलसह अन्य प्ले स्टोअर्समध्ये चॅटबॉट असलेले अॅप शोधत असाल, तर त्यांचे डेव्हलपर्स कोण आहेत हे नीट तपासून घ्या. चॅटजीपीटी असल्याचे दावा करणारे अॅप डाउनलोड करुन वापरण्याआधी त्यांची डेव्हलपरची प्रोफाइन व्यवस्थित तपासावी.
User Review वाचून घ्या.
चॅटजीपीटी अॅप असल्याचा दावा करणाऱ्या अॅप्सचे यूजर रिव्ह्यू नीट वाचून घ्यावेत. टॉप रिव्ह्यू पाहून तुम्ही खात्री करुन घेऊ शकता. पण काही वेळेस हे रिव्ह्यू देखील अॅपप्रमाणे खोटे असतात. त्यामुळे सर्व रिव्ह्यू तपासवेत. काही ठिकाणी रिव्ह्यूसह स्टार्सची पद्धत असते. लोकांनी अॅप वापरावे यासाठी फेर स्टार रेटिंग्स दिल्या जातात. रिव्ह्यूप्रमाणे स्टार रेटिंग्सही तपासून हे अॅप धोकादायक तर नाही ना हे जाणून घेऊ शकता.
प्ले स्टोअर्सवर चॅटजीपीटी किंवा जीपीटी-४ असल्याचा दावा करणाऱ्या बनावट अॅप्सवर एका वापरानंतर लगेच सबक्रिप्शन घेण्यास सांगितले जाते. सबक्रिप्शन घेताना अॅपच्या सिस्टीमद्वारे बॅंकेशी संबंधित माहिती मिळवून फसवूणक केली जाते.
आणखी वाचा – Instagram च्या पर्सनल आणि प्रोफेशनल अकाउंट्समध्ये काय फरक असतो? जाणून घ्या…
Free Options चा वापर करावा.
वेबवर गुगल बार्ड, मायक्रोसॉफ्ट बिंग चॅट यांच्यासह ओपन ए.आय.च्या चॅटजीपीटीचा विनामूल्य वापर करता येतो. असे करुन तुम्ही चॅटबॉटसाठीचेक्रो साप्ताहिक आणि मासिक शुल्क भरण्यापासून वाचू शकता. क्रोम ब्राउजरच्या माध्यमातून मोफत आणि सुरक्षित चॅटबॉट सेवांचा वापर करु शकता.