AI म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये मोठी क्रांती झाल्याचे पाहायला मिळते. या नव्या तंत्राच्या मदतीने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होताना दिसत आहेत. गेल्या वर्षी नोहेंबर महिन्यात ओपनआयने आपला पहिला चॅटबॉट ChatGpt लॉन्च केला आहे. सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. सध्या ते इंग्रजी भाषेवर काम करते. हे भविष्यात इतर भाषांमध्ये जोडले जाऊ शकते.  जर का तुम्ही चॅटजीपीटीमधील चांगल्या गोष्टींऐवजी त्यातील त्रुटी सांगितल्यास तुम्हाला लाखो रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. ते कसे ते आपण जाणून घेऊयात.

ChatGPT डेव्हलपर कंपनी OpenAI एक प्रोग्राम चालवत आहे. OpenAI बग बाउंटी प्रोग्राममध्ये, जे लोक कंपनीच्या या टेक्नॉलॉजीमधील त्रुटी दाखवतील त्यांना बक्षीस दिले जाणार आहे. कंपनीकडून ChatGpt मधील प्रत्येक त्रुटीला २०० डॉलर म्हणजेच १६.४२ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

Viral Video Shows little girls playing Bhatukali
‘खरंच खूप भारी होते ते दिवस…’ भांडीकुंडी आणली, पानांची बनवली पोळी-भाजी अन्… VIRAL VIDEO पाहून आठवेल बालपण
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Little girl Happiness to burst the bubble wrap
VIRAL VIDEO : ‘बबल रॅप म्हणजे प्रेम!’ चिमुकलीचा उत्साह पाहून नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स; म्हणाले, ‘आम्हीसुद्धा लहानपणी…’
Raj Thackeray
Raj Thackeray in Nashik : “निवडणुका म्हणजे तुम्हाला सांगतो…”, प्रचारसभांना कंटाळून राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
Uddhav Thackeray
कोकणातीन सभेतून उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंवर हल्लाबोल; दीपक केसरकरांनाही केलं लक्ष्य; म्हणाले…

हेही वाचा : ChatGpt Plus: चॅटबॉट वापरासाठी आता मोजावे लागणार ‘इतके’ पैसे, जाणून घ्या

काय आहे बग बाउंटी प्रोग्राम ?

तंत्रज्ञान कंपन्या अनेकदा बग बाउंटी प्रोग्राम चालवतात. यामध्ये प्रोग्रामर आणि एथिकल हॅकर्सना सॉफ्टवेअर सिस्टीममधील बग शोधण्यासाठी आमंत्रित केले जाते. एखाद्या हॅकर किंवा प्रोग्रामरला सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी आढळल्यास, त्याला बक्षीस दिले जाते. अशा उप्रक्रमामुळे कंपनीला सॉफ्टवेअर आणि उत्पादने मजबूत करण्याची संधी मिळते. बाउंटी प्लॅटफॉर्म Bugcrowd नुसार, OpenAI ने संशोधकांना ChatGPT च्या कार्याचे पुनरावलोकन करण्यासाठी सांगितले आहे. याशिवाय थर्ड पार्टी अ‍ॅप्लिकेशन्ससोबत डेटा शेअर करण्यासाठी OpenAI सिस्टीम कशी काम करते याचे टेस्टिंग देखील करण्यात येणार आहे. तथापि, या प्रोग्राममध्ये OpenAI च्या सिस्टमद्वारे जनरेट केलेल्या चुकीचा आणि धोकादायक कंटेंटच्या टेस्टिंगचा समावेश नाही.

१६ लाख रुपये जिंकण्याची संधी

कंपनीची ऑफर अशा वेळी आली आहे जेव्हा इटलीने डेटा प्रायव्हसीबाबत ChatGPT वर बंदी घातली आहे. इतर युरोपीय देश देखील जनरेटिव्ह एआय सेवांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. ChatGPT डेव्हलपर कंपनी OpenAI एक प्रोग्राम चालवत आहे. OpenAI बग बाउंटी प्रोग्राममध्ये, जे लोक कंपनीच्या या टेक्नॉलॉजीमधील त्रुटी दाखवतील त्यांना बक्षीस दिले जाणार आहे. कंपनीकडून ChatGpt मधील प्रत्येक त्रुटीला २०० डॉलर म्हणजेच १६.४२ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.