अनेक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर ChatGpt मोबाइल अॅप अखेर अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध झाले आहे. iOS व्हर्जनवर लॉन्च झाल्यानंतर हे अॅप दोन महिन्यांनी अँड्रॉइड व्ह्जर्नवर लॉन्च झाले आहे. गेल्या वर्षी ओपनएआय कंपनीने आपला ChatGpt चॅटबॉट लॉन्च केला आहे. तसेच गुगल आणि मायक्रोसॉफ्टने देखील आपले चॅटबॉट लॉन्च केले आहेत.
सॅम ऑल्टमन यांच्या कंपनीने हे अॅप अँड्रॉइड व्हर्जनवर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात लॉन्च केले जाईल अशी घोषणा केली होती. विशेष म्हणजे अँड्रॉइड अॅप अशा वेळी आले आहे जेव्हा चॅटजीपीटीच्या ट्रॅफिकमध्ये घसरण आणि तिसादाचा वेळ कमी असल्याच्या बातम्यांशी झगडत आहे. मात्र अॅप लॉन्च झाले असून आता ते तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर रजिस्ट्रेशन करू शकता.
ओपनएआयची येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये अँड्रॉइड अॅपची उपलब्धतेचा विस्तार करण्याची योजना आहे. यादी हे अॅप केवळ iOS युजर्ससाठीच उपलब्ध करून देण्यात आले होते. आता अँड्रॉइडवर देखील हे लॉन्च झाल्यामुळे लाखो अँड्रॉइड युजर्स आता चॅटजीपीटीचा लाभ घेऊ शकणार आहेत. हे अॅप विनामूल्य उपलब्ध असणार आहे.
चॅटजीपीटी हे मोबाइल App सध्या भारत,अमेरिका, बांगलादेश आणि ब्राझीलमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. ओपनएआय हे अॅप एकाच वेळी जगभरात उपलब्ध करून देण्याऐवजी टप्प्याटप्प्याने रोलआउट करणार आहे.
हेही वाचा : Unpacked 2023: सॅमसंग लॉन्च करणार ‘हे’ गॅजेट्स; कधी आणि कुठे पाहता येणार लाईव्ह इव्हेंट?
OpenAI द्वारे नोव्हेंबर २०२२ मध्ये ChatGpt लॉन्च केले आहे. हे एक भाषेवर आधारित चॅटबॉट आहे. तो आपल्या हव्या असणाऱ्या प्रश्नाची उत्तरे देतो. कविता, निबंध लिहून देतो. चॅटजीपीटीचा वापर सर्वत्र मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ते लॉन्च झाल्यापासून चार महिन्यांमध्ये कमीत कमी वेळेत १०० मिलियन युजर्स होणारे ते सर्वात वेगवान अँप्लिकेशन बनले आहे. हे GPT-3.5 आणि GPT-4 वर तयार केले आहे. सध्या आत्तापर्यंत, GPT-4 फक्त ChatGPT Plus सदस्यांसाठी उपलब्ध आहे. ज्यांना भारतात महिन्याला मेंबरशिपसाठी १,९९९ रुपये द्यावे लागतील.