सध्या वातावरणात थोडा गारवा जाणवत आहे. साधरणतः दिवाळीपासून जानेवारी महिन्यातील मकरसंक्रांतीपर्यंत थंडी असते. त्यानंतर हळूहळू हवेत उष्णता जाणवायला लागते. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात प्रखर उन्हाळा जाणवतो. या कडक उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. वाळ्याचे पडदे लावतो. मात्र लोकांचा जास्त कल हा कूलर खरेदी करण्याकडे असतो. कूलर ही अशी वस्तू आहे की जी तुम्हाला प्रत्येकाच्या घरात दिसतेच.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उन्हाळ्यात सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये त्याची गणना केली जाते. तुम्ही सुद्धा तुमच्या बजेटमध्ये कूलर (लो बजेट कूलर ) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आपण असेच काही कूलर बघणार आहोत ज्यांची किंमत परफॉर्मन्स चांगला आहे.आज जे कूलर आपण बघणार आहोत जे पोर्टेबल आहेत म्हणजे हे तुम्हला तुमच्या टेबलवर किंवा कमी जागेत ठेवता येणार आहेत. हे कूलरचा आवाजही येत नाही.

GUGGU ZRR 651M MI Air Conditioner Mini Cooler

हा कूलर MI या स्मार्टफोन उत्पादक कंपनीने तयार केला आहे. हा कूलर तुमच्यासाठी उन्हाळ्यात एक चांगला पर्याय ठरू शकतो. याची किंमत ७९९ रुपये असून, मात्र यावर तुम्हाला ३७ टक्के डिस्काउंट मिळत असून तुम्ही तो ४९९ रुपयां खरेदी करू शकणार आहात. हा कूलर तुम्ही तुमच्या डिस्कमध्ये सहज बसवू शकता.

हेही वाचा : Elon Musk यांनी गेल्या वर्षात दान केले तब्बल ‘इतक्या’ किंमतीचे शेअर्स, जाणून घ्या

SYARA Mini Cooler हा कूलर देखील पोर्टेबल आणि स्वस्त किंमतीच्या कुलरच्या यादीत उपलब्ध आहेत. हा मिनी कूलर तुम्ही ऑनलाईन देखील खरेदी करू शकता. याची किंमत ७९९ रुपये आहे. मात्र ऑनलाईन हा कूलर तुम्हाला मिळण्यास थोडा वेळ लागू शकतो. बुकिंग केल्यापासून २ आठवड्यांमध्ये तुम्हाला मिळू शकतो. हा कूलर तुम्ही ७ दिवसांमध्ये रिप्लेस करू शकता.

हेही वाचा : ChatGpt News: Velocity ने लॉन्च केला भारतातील पहिला AI असिस्टंट ‘Lexi’, जाणून घ्या खासियत

P K INTERNATIONAL Portable Dual Bladeless Cooler

तुम्ही स्वस्त दरात चांगला पोर्टेबल कूलर मिळवायचा असेल तर या कूलरपेक्षा काही चांगले असू शकत नाही. पहिल्या दोन कूलरपेक्षा याची किंमत निश्चितपणे जास्त असणार आहे. हा कूलर तुम्ही फ्लिपकार्टवरून ऑर्डर करू शकता. हा कूलर पोर्टेबल असल्याने त्याची मागणी जास्त आहे. याची किंमत ही १,४९९ रुपये आहे. मात्र तुम्हाला या कूलरवर ६८ टक्के डिस्काउंट मिळत आहे त्यामुळे तुम्ही हा कूलर ४७४ रुपयांना खरेदी करू शकणार आहात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheapest mini portable air cooler under 500 hundred rupees tmb 01