Cheapest Recharge Plans List : सध्या विविध दूरसंचार कंपन्यांच्या रिचार्जच्या किंमतींमध्ये दिवसेंदिवस चढ-उतार होत आहेत. रिचार्ज प्लॅनच्या वाढत्या किमतींमुळे सिम कार्ड ॲक्टिव्ह (सक्रिय) ठेवणे युजर्ससाठी आता अगदी खर्चीक होऊ लागले आहे. रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, वोडाफोन आयडिया (Vi), व BSNL (भारत संचार निगम लिमिटेड) या सर्वांनी गेल्या अनेक महिन्यांत त्यांचे रिचार्ज प्लॅन (Recharge Plans) अपडेट केले आहेत.

तुमचे सिम ॲक्टिव्ह ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग ठरविण्यात मदत करण्यासाठी प्रत्येक ऑपरेटरने २०२५ मध्ये ऑफर केलेल्या सर्वांत कमी रिचार्ज प्लॅनची (Recharge Plans) एक यादी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

१. रिलायन्स जिओ युजर्सना त्यांचे सिम कार्ड ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी १८९ रुपयांचा रिचार्ज करणे बेस्ट ठरू शकते. हा प्लॅन २८ दिवसांच्या वैधता, अमर्यादित व्हॉइस कॉल, ३०० एसएमएस व एकूण २ जीबी डेटा ऑफर करतो. या फायद्यांसह युजर्सना जिओ टीव्ही, जिओ सिनेमा (नॉन-प्रीमियम) व जिओ क्लाऊडमध्ये प्रवेशदेखील मिळतो.

iPhone SE 4 launch Tomorrow
iPhone SE4 : २० तासांच्या बॅटरी लाईफसह स्वस्तात मस्त iPhone येतोय बाजारात! असतील ‘हे’ जबरदस्त फीचर्स
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Airtel tariff hike Further tariff hike needed for financial stability: Airtel MD Vittal
Airtel यूजर्सचं टेन्शन वाढले; रिचार्ज महागण्याची शक्यता; कंपनीच्या एमडींच्या ‘या’ विधानाने चर्चांना उधान
Mobile phone tariff declined 94 pc since 2014 says Jyotiraditya
मोबाईल फोन सेवांचे दर देशात सर्वाधिक कमी; इतकी स्वस्त झाली सेवा
Jio Launched affordable recharge Plan
Jio Affordable Plan : जिओने गुपचूप लाँच केला स्वस्त रिचार्ज प्लॅन! फक्त ‘इतक्या’ रुपयांमध्ये महिनाभर वापरता येईल इंटरनेट
TRAI intervention: Jio, Airtel, Vi launch revised voice-only recharge plans
युजर्ससाठी आनंदाची बातमी; महागड्या रिचार्जपासून दिलासा! TRAI च्या कारवाईनंतर Jio-Airtel-VI-BSNL ने कमी केल्या किंमती
Airtel vs Jio vs Vi Recharge Plans
Airtel vs Jio vs Vi: फक्त कॉल आणि एसएमएस रिचार्जकरिता कोण देत आहे सर्वात स्वस्त प्लॅन? रोजचा खर्च येईल फक्त ५ रुपये
Reliance Jio Rs 458, Rs 1,958 voice and SMS-only plans launched to abide by TRAI’s guidelines
जिओ यूजर्ससाठी आनंदाची बातमी! ३६५ दिवसांच्या वॅलिडीटीचे ‘हे’ २ सर्वात स्वस्त प्लॅन एकदा पाहाच

२. एअरटेल युजर्सना त्यांचे सिम ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी एअरटेलचा सर्वांत स्वस्त प्लॅन (Recharge Plans) जिओच्या तुलनेत किंचित महाग आहे. प्लॅनची ​​किंमत १९९ रुपये आहे आणि तो २८ दिवसांची वैधता प्रदान करतो. त्यामध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल, दररोज १०० एसएमएस व २ जीबी डेटाचा समावेश आहे. या प्लॅनचे फायदे जिओसारखेच असले तरी रोजची एसएमएस मर्यादा जास्त आहे. ज्यांना वारंवार एसएमएस पाठवायचे असतात, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

३. व्हीआय युजर्सना त्यांच्या लोकेशननुसार वेगवेगळे रिचार्ज पर्याय ऑफर केले जातात. त्यामध्ये ९९ व १५ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनचा समावेश आहे. ९९ रुपयांचा प्लॅन १५ दिवसांसाठीची वैधता ऑफर करतो आणि २०० जीबी डेटा देतो. तसेच ९९ रुपयांच्या टॉक टाइममध्ये एसएमएसची ऑफर दिली जात नाही. जर एखाद्या युजरला अधिक चांगल्या फायद्यांसह योजना हवी असेल, तर त्यांना १५५ रुपयांची योजना निवडावी लागेल, जी सर्व क्षेत्रांमध्ये उपलब्धतेनुसार बदलते.

४. ज्या बीएसएनएल युजर्सना त्यांचे सिम सक्रिय ठेवायचे आहे, त्यांच्यासाठी बीएसएनएल हा सर्वांत परवडणारा पर्याय आहे. ५९ रुपयांच्या प्लॅनमध्ये सात दिवसांची वैधता, अमर्यादित कॉल्स, दररोज १ जीबी डेटा मिळतो. थोड्या जास्त कालावधीसाठी, ९९ रुपयांची योजना अमर्यादित कॉलिंगसह १७ दिवसांपर्यंत वैधता देते. पण, एसएमएस किंवा डेटासारखे कोणतेही अतिरिक्त फायदे देत नाही.

सर्वांत कमी किमतीत शॉर्ट टर्मच्या वैधतेसाठी, बीएसएनएलची ५९ रुपयांची योजना सर्वांत परवडणारी आहे; पण ती फक्त एक आठवडाभर टिकते. पूर्ण महिन्याच्या वैधतेसाठी जिओचा १८९ रुपयांचा प्लॅन एअरटेलच्या १९९ रुपयांच्या प्लॅनपेक्षा स्वस्त आहे. जरी एअरटेल दररोज अधिक एसएमएसची ऑफर देत असला तरीही… व्हीआयचा ९९ रुपयांचा प्लॅन सर्वांत कमी किमतीचा असला तरीही त्याचे फायदे कमी आहेत. शेवटी कॉल, डेटा आणि मेसेजसाठी तुमचे सिम तुम्ही किती वेळा वापरता यावर ते अवलंबून असते.

Story img Loader