फ्लिपकार्टवर ब्लॅक फ्रायडे सेल सुरू असून त्यामध्ये अनेक टीव्ही, स्मार्टफोन आणि इतर अनेक उपकरणांवर मोठी सूट मिळत आहे. तुम्ही टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर हा सेल तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो. सेलमध्ये काही स्मार्ट टीव्हींवर मोठी सूट मिळत आहे. हा सेल केवळ ३० नोव्हेंबर पर्यंतच आहे. सेलमध्ये बँक ऑफर्स, एक्सचेंज ऑफर्स, नो कॉस्ट ईएमआय ऑफर देखील उपलब्ध आहे. याद्वारे तुमची आणखी बचत होऊ शकते. सेलमध्ये ज्या स्मार्ट टीव्हींवर बेस्ट डील मिळत आहेत त्यांच्याबाबत आपण जाणून घेऊया.
१) रिअलमी निओ टीव्ही (३२ इंच)
फ्लिपकार्टवर realme NEO HD Ready LED Smart Linux TV ची मूळ किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे, मात्र या टीव्हीवर ४५ टक्के सूट देण्यात आल्याने तो ११ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. टीव्हीवर एक्सचेंज ऑफर मिळत असून त्याद्वारे ११ हजार रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. त्याचबरोबर, बँक ऑफर जसे सीटी क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शनवर तुम्हाला १५०० रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. हा टीव्ही लिनक्सवर चालत असून त्यातून २० वॉट साउंड आऊटपूट मिळतो.
(‘PTRON’ने सादर केला जबरदस्त नेकबँड, सिंगल चार्जवर ६० तासांच्या बॅटरी लाइफचा दावा, किंमत केवळ..)
२) एमआय ५ ए (३२ इंच) टीव्ही
फ्लिपकार्टवर Mi 5A HD Ready LED Smart Android TV ची मूळ किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे, मात्र या टीव्हीवर ४६ टक्के सूट देण्यात आल्याने त्याची किंमत १३ हजार ४९९ रुपये झाली आहे. टीव्हीवर एक्सचेंज ऑफरही मिळत असून याद्वारे तुम्ही ११ हजार रुपयांपर्यंतची बचत करू शकता. टीव्हीवर बँक ऑफर्स देखील मिळत आहेत. सीटी क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शनवर तुम्हाला १५०० रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. हा टीव्ही अँड्रॉइडवर चालत असून तो गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट इन बिल्टला सपोर्ट करतो. टीव्हीमधून ६० हर्ट्झचा रिफ्रेश रेट आणि २० वॉटचा साउंड आऊटपूट मिळतो.
३) एलजी (३२ इंच) एचडी रेडी टीव्ही
फ्लिपकार्टवर LG (32 inch) HD Ready LED Smart WebOS TV ची मूळ किंमत २१ हजार ९९० रुपये आहे, मात्र या टीव्हीवर ३६ टक्के सूट देण्यात आल्याने त्याची किंमत १३ हजार ९९० रुपये झाली आहे. टीव्हीवर एक्सचेंज ऑफरही मिळत असून याद्वारे तुम्ही ११ हजार रुपयांपर्यंतची बचत करू शकता. टीव्हीवर बँक ऑफर्सदेखील मिळत आहेत. सीटी क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शनवर तुम्हाला १५०० रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. हा टीव्ही वेबओएसवर चालतो. तुम्ही या टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि डिजनी प्लस हॉटस्टर पाहू शकता. टीव्हीमधून ५० हर्ट्झचा रिफ्रेश रेट आणि १० वॉटचा साउंड आऊटपूट मिळतो.
(ग्रामीण भागात इटरनेटसाठी ‘BSNL’ला वीज व जमीन राज्य सरकारकडून मोफत)
४) वनप्लस वाय १ फूल एचडी एलईडी टीव्ही
फ्लिपकार्टवर OnePlus Y1 (40 inch) Full HD LED Smart Android TV ची मूळ किंमत २७ हजार ९९९ रुपये आहे, मात्र या टीव्हीवर २८ टक्के सूट देण्यात आल्याने त्याची किंमत १९ हजार ९९९ रुपये झाली आहे. टीव्हीवर एक्सचेंज ऑफरही मिळत असून याद्वारे तुम्ही ११ हजार रुपयांपर्यंतची बचत करू शकता. टीव्हीवर बँक ऑफर्सदेखील मिळत आहेत. सीटी क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शनवर तुम्हाला १५०० रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. हा टीव्ही अँड्रॉइडवर चालतो आणि नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिजनी प्लस हॉटस्टार आणि यूट्यूबला सपोर्ट करतो. टीव्हीमधून ५० हर्ट्झचा रिफ्रेश रेट आणि १० वॉटचा साउंड आऊटपूट मिळतो.