Check Aadhaar linked SIMs Using The Sanchar Saathi Portal : आजच्या डिजिटल काळात आधार कार्ड आणि मोबाइल क्रमांक या दोन्ही गोष्टी खूप आवश्यक आहेत. आधार कार्ड बँक, नोकऱ्या, सरकारी सेवांसाठी प्रमुख ओळख आणि कागदपत्र म्हणून काम करते, तर मोबाइल फोन आपल्याला इतरांनाही कनेक्ट ठेवण्यास मदत करतो. याचबरोबर या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशीसुद्धा संबंध आहे. म्हणजेच आधार कार्डचा वापर मोबाइलमधील सिम कार्ड खरेदी करण्यासाठी केला जातो. पण, या प्रक्रियेत अनेकदा फसवणूक किंवा गैरवापरसुद्धा होऊ शकतो. तर हे टाळण्यासाठी तुमच्या आधारकार्ड अंतर्गत किती सिम ॲक्टिव्ह (Aadhaar linked SIMs) आहेत हे जाणून घेणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दूरसंचार विभागाच्या (DoT) नियमांनुसार, एखादी व्यक्ती एका आधार कार्डशी जास्तीत जास्त नऊ सिम कार्ड लिंक करू शकते. ही मर्यादा ओलांडल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. तुमच्या आधारशी किती नंबर लिंक(Aadhaar linked SIMs) केले आहेत याबद्दल तुम्हाला खात्री नसल्यास, तुम्ही काही मिनिटांत ऑनलाइन तपासू शकता. कसे ते जाणून घ्या…

१. पहिल्यांदा टेलिकॉम ऑपरेटरच्या वेबसाइटला भेट द्या

तुमच्या दूरसंचार ऑपरेटरच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या (उदाहरणार्थ एअरटेल, जिओ, व्हीआय किंवा बीएसएनएल ).
‘आधार लिंकिंग’ किंवा ‘व्हेरिफाय नंबर’ पर्याय शोधा.
तुमच्या आधार कार्डचे डिटेल्स लिहा आणि सबमिट करा.
नंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक ओटीपी मिळेल.
तुमच्या आधारशी लिंक केलेल्या ॲक्टिव्ह क्रमांकांची यादी पाहण्यासाठी ओटीपी एंटर करा.

२. मोबाइल यूएसएसडी कोडद्वारे तपासा

तुमच्या मोबाइल फोनवरून **121# * डायल करा.
लिंक केलेले मोबाइल नंबर तपासण्यासाठी ऑन-स्क्रीन माहितीचे अनुसरण करा.
ही सेवा दूरसंचार ऑपरेटरद्वारे पडताळणीसाठी (verification) प्रदान केली जाते.

याव्यतिरिक्त तुम्ही संचार साथी पोर्टल वापरून आधार कार्डशी लिंक केलेले सिमसुद्धा तपासू शकता…

सरकारने आधारशी लिंक केलेले मोबाइल नंबर ट्रॅक करण्यासाठी संचार साथी पोर्टल https://www.sancharsaathi.gov.in/ सुरू केले आहे.

त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी संचार साथी पोर्टलच्या वेबसाइटला जावे लागेल.
नंतर ‘Citizen Centric Services’ वर क्लिक करा.
‘Know Your Mobile Connections (TAFCOP)’ हा पर्याय निवडा.
तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर एंटर करा आणि तुमच्या फोनवर पाठवलेला ओटीपी वापरून त्याची पडताळणी (verification) करा.
पडताळणी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधारशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरची यादी दिसेल.

तुम्ही तुमचे आधार कार्डशी लिंक (Aadhaar linked SIMs) केलेले सिम नियमितपणे का तपासावे?

सिम नोंदणीसाठी तुमच्या आधारचा अनधिकृत वापर टाळण्यासाठी.
फसवणूक किंवा बेकायदा ॲक्टिव्हिटी तुमच्या माहितीचा गैरवापर करणार नाही, याची खात्री करण्यासाठी
या सोप्या स्टेप्सचे अनुसरण करून, तुम्ही तुमचे आधार-लिंक केलेले सिम कार्ड सहजपणे ट्रॅक करू शकता.