Samsung Galaxy A04 And Galaxy A04e Comparison : सॅमसंगने आपल्या गॅलक्सी सिरीजमध्ये दोन नव्या सदस्यांचा समावेश केला आहे. कंपनीने भारतात Samsung Galaxy A04 आणि Samsung Galaxy A04 e ही दोन बजेट स्मार्टफोन्स लाँच केली असून दोन्ही फोन दिवसभर चालू शकतात, असा दावा करण्यात आला आहे. दोन्ही बजेट फ्रेंडली फोन्स असून त्यांची किंमत ९ हजार २९९ रुपयांपासून सुरू होते आणि त्यांना आजपासून सॅमसंग ऑनलाइन स्टोअर आणि निवडक रिटेल आउटलेट्समधून खरेदी करता येऊ शकते. आज दोन्ही फोन्सची तुलना करूया. यातून तुम्हाला गरजेनुसार फोन निवडणे सोपे होईल.
किंमत, रंग पर्याय
Samsung Galaxy A04 दोन स्टोअरेज मॉडेल्समध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. ६५ जीबी स्टोअरेज व्हेरिएंटची किंमत ११ हजार ९९९ रुपये असून १२८ जीबी मॉडेलची किंमत १२ हजार ९९९ रुपये आहे. तर Samsung Galaxy A04e तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. बेस मॉडेल ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोअरेज व्हेरिएंट ९ हजार २९९, ३ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेज व्हेरिएंट ९ हजार ९९९ रुपायंमध्ये तर ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोअरेज व्हेरिएंट ११ हजार ४९९ रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. फोन लाइट ब्ल्यू आणि कॉपर या दोन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहा.
(Flashback 2022 : ‘ही’ आहेत २०२२ मधील Top 5 Best Smartwatches, टाका एक नजर)
Samsung Galaxy A04 विरुद्ध Samsung Galaxy A04e
Specifications | Samsung Galaxy A04 | Samsung Galaxy A04e |
Colour options | Green, Copper, Black | Light Blue, Copper |
Battery | 5,000mAh | 5,000mAh |
Front camera | 5MP | 5MP |
RAM | 4GB | 3GB, 4GB |
Storage | 64GB, 128GB | 32GB, 64GB, 128GB |
Processor | MediaTek Helio P35 | MediaTek Helio P35 |
Operating system | One UI Core 4.0 based on Android 12 | One UI Core 4.0 based on Android 12 |
Rear camera | 50MP main camera + 2MP depth camera | 13MP main camera + 2MP depth camera |
वर दिलेल्या तक्त्यात दोन्ही फोन्सच्या फीचर्सची तुलना करण्यात आली आहे. तुम्ही बजेट, आवडते फीचर्स आणि आवश्यकतेनुसार Samsung Galaxy A04 आणि Samsung Galaxy A04e फोन खरेदी करू शकता.