सध्या भारतामध्ये ऑनलाइन पेमेंट करण्याचे प्रमाण मोठ्या वेगाने वाढत आहे. डिजिटल इंडियामुळे अनेक लोक कॅशलेस व्यवहारावर अधिक भर देत आहेत.तसेच डिजिटल वॉलेट हा भारतामधील ऑनलाइन पेमेंट करण्याचा सर्वोत्तम पर्याय सध्या उपलब्ध आहे. हा पर्याय फक्त upi पेमेंटपेक्षा थोडासा वेगळा आहे. डिजिटल पेमेंटच्या बाबतीत, एखाद्याला वॉलेट आधी प्रीलोड करणे आवश्यक आहे. जे नंतर जनरल स्टोअर्स, हॉटेल्स किंवा ऑनलाइन ई-कॉमर्स वेबसाइटवर देखील पेमेंट करण्यासाठी वापरता येते. Amazon Pay हे भारतामधील असेच एक प्रमुख डिजिटल वॉलेट आहे.

Amazon Pay वॉलेटमध्ये पैसे घेण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्याकडे amazon चे अकाऊंट असणे आवश्यक आहे. जे तुम्ही मोफत डाउनलोड करू शकता. तसेच तुमच्याकडे amazon प्राइमचे सबस्क्रिप्शन असल्यास तुम्हाला amazon pay कहा वापर करून काही निवडक पेमेंटवर अतिरिक्त ऑफर्स आणि कॅशबॅक मिळू शकतो. Amazon Pay चा आणखी एक फायदा म्हणजे तो UPI पेमेंटप्रमाणे अयशस्वी होत नाही.

snake viral video | snake bit video
बापरे! सापाने दंश करताच तरुणाने केलं असं काही की, VIDEO पाहून तुम्हालाही भरेल धडकी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
rap songs campaigning
प्रचारासाठी ‘रॅप’चा ठेका, मतदारांना आकर्षित करण्याकडे उमेदवारांचा कल
fraud of One lakh with CME professor in the name of courier
कुरिअरच्या नावाखाली सीएमईच्या प्राध्यापकाची एक लाखांची फसवणूक
The first college in Maharashtra
Video : महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय आहे पुण्यात! २०० वर्षे जुने हे कॉलेज माहितेय का?
Puneri pati in outside temple for couples funny photo goes viral on social media
PHOTO: “प्रेमी युगुलांना इशारा…” मंदिराबाहेर लावली खतरनाक पुणेरी पाटी; वाचून पोट धरुन हसाल

हेही वाचा : हिटमॅन रोहित शर्मा बनला JioCinema चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर; डिजिटल स्ट्रीमिंगला मिळणार वेग, आयपीएल चाहत्यांची मजा द्विगुणित होणार

Amazon Pay अकाऊंट डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये लॉग इन करण्यासाठी तुमच्याकडे Android किंवा iOS असे एक डिव्हाईस असणे आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे कोणत्याही प्लॅटफॉर्मवर Amazon pay हे app नाही आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या pc वरुण paise अ‍ॅड करू शकता. मात्र ते खर्च करण्यासाठी तुमच्याकडे फोन असणे आवश्यक आहे. याकहा वापर केवळ amazon वर खरेदी करताना करू शकतो. किंवा Amazon Pay स्वीकारणाऱ्या विक्रेत्याला पैसे देऊ शकता

Amazon Pay मध्ये पैसे कसे अ‍ॅड करावे ?

१. सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या मोबाईलवर Amazon App ओपन करा. आणि त्यामध्ये तुम्ही लॉग इन केले असल्याची खात्री करून घ्या.

२. त्यानंतर होमपेजवर तुम्हाला Amazon Pay नावाचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.

हेही वाचा : HCLTech मध्ये ८५ टक्के कर्मचाऱ्यांना मिळणार Variable Pay; CPO राम सुदंरराजन म्हणाले, “आर्थिक वर्ष…”

Amazon Pay मध्ये पैसे कसे अ‍ॅड करावे ? (Image Credit- amazon/indian express)

३. पुढील मेनूमध्ये तुमच्यासमोर चार पर्याय दिसतील. त्यातील Add Money हा तिसरा पर्याय सिलेक्ट करावा.

४. त्यानंतर तुम्हाला पुढील पेजवर Amazon Pay बॅलन्स आणि गिफ्ट कार्डचा बॅलन्स असे डिटेल्स दिसतील.

Amazon Pay मध्ये पैसे कसे अ‍ॅड करावे ? (Image Credit- amazon/indian express)

५. यानंतर तुम्ही add money या पर्यायावर कॅलसिक करा. तिथे तुमच्या Amazon Pay च्या अकाउंटमध्ये १ रुपयांपासून अगदी १ लाख इतकी रक्कम Add करू शकता.

६. तुम्हाला तुमच्या Amazon Pay मध्ये Add कार्याची असलेली रक्कम टाईप करा . ही रक्कम तुम्ही तुमच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड तसेच UPI पेमेंट करून पूर्ण करू शकता.

Amazon Pay मध्ये पैसे जोडण्यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस आकारात नाही. तुम्ही १,००० रुपये Add केले तर ते तुमच्या बँक अकाऊंटमधून कट होतील. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही एकदा का Amazon Pay वॉलेटमध्ये पैसे Add केले कि ते पुन्हा तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करता येत नाहीत.