सध्या आधार कार्ड हे आपल्या ओळख पत्रांपैकी सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज बनलं आहे. तुमचं आधार कार्ड हे तुमचा मोबाईल नंबर, बँक खाते, पॅन कार्ड आणि इतर अनेक कागदपत्रांशी जोडलेलं आहे. आधार कार्ड हे बारा अंकी युनिक नंबरसह येतो, जो UIDAI द्वारे जारी केला जातो. आधार कार्ड धारकासाठी १२ अंकी क्रमांक खूप महत्त्वाचा आहे. तुमची सर्व वैयक्तिक माहिती त्यात दडलेली असते.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
आधार कार्डमध्ये प्रत्येक नागरिकाचे नाव, जन्मतारीख, बायोमॅट्रिक तपशील नोंदवला जातो. आधार कार्ड क्रमांकाद्वारे तुमचा बॅंक बॅलन्स सुद्धा तुम्ही तपासू शकता, तुम्हाला बॅंकेचा खाते क्रमांकाची सुद्धा गरज नाही. यासाठी अतिशय सोपी प्रक्रिया तुम्हाला फॉलो करावी लागेल.
असा तपासा आधार कार्डद्वारे बँक बॅलन्स
- आधारचा वापर बॅंक खाते उघडण्यापासून, आयकर रिटर्न भरणे, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, प्रवास करताना, सरकारी कामकाजासाठी, आयआरसीटीद्वारे तिकीट काढताना अशा विविध कामांसाठी केला जातो. आधार क्रमांक बॅंक खात्याशी लिंक करणे सुद्धा आवश्यक आहे. फक्त १२ अंकी आधार क्रमांकाद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात जमा झालेल्या पैशांची माहिती घेऊ शकता.
आणखी वाचा : तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज घेतलंय का? जाणून घ्या ‘या’ सोप्या पद्धतीने…
- इंटरनेट नसताना आणि स्मार्टफोनचा जास्त वापर करत नाही त्यांच्यासाठी आधारद्वारे बॅंक खात्याचे तपशील जाणून घेणे खूप फायदेशीर आहे. बॅंक बॅलन्स तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवरून *९९*९९*१# वर कॉल करा. यानंतर तुम्हाला १२ अंकी आधार क्रमांक टाकण्यास सांगितले जाईल यानंतर या क्रमांकाची पडताळणी करण्यासाठी तुम्हाला पुन्हा आधार क्रमांक टाकावा लागेल.
- यानंतर तुम्हाला UIDAI कडून संदेश येईल यामध्ये तुम्ही बॅंक बॅलन्स सहज तपासू शकता. आधार कार्डचा वापर पैसे पाठवणे, सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता. यासाठी UIDAI ने देशातील ५३ प्रमुख शहरांमध्ये एकूण ११४ आधार सेवा केंद्र उघडण्याची योजना तयार केली आहे.
First published on: 21-09-2022 at 15:11 IST
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Check your bank account balance with this 12 digit number only pdb