Ayodhya Ram Mandir Inauguration: बहुप्रतीक्षित श्रीराम मंदिराच्या उदघाटनाची तयारी अयोध्यामध्ये अत्यंत उत्साहात सुरू आहे. मंदिरात भगवान श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी होईल. त्यानिमित्ताने देशभरातील रामभक्त अयोध्येत दाखल होण्याची शक्यता आहे. अयोध्येत १५ ते २२ जानेवारीदरम्यान अनेक पर्यटक, भाविक, व्हीआयपी भेट देतील; तर देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी एका खास ॲपची सोय करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘दिव्य अयोध्या डिजिटल पर्यटन मोबाइल ॲप’ ( Divya Ayodhya Tourism App) लाँच केला आहे. या ॲपचा उद्देश भाविक आणि पर्यटकांसाठी अयोध्या नेव्हिगेट करणे सोपे आहे. अयोध्येतील सांस्कृतिक ठिकाणे, मंदिरे, मठ आणि ऐतिहासिक स्थळे आदी ठिकाणांची माहिती तुम्हाला दिली जाईल.

हेही वाचा…Republic Day 2024: जिओच्या जबरदस्त ऑफर्स लॅान्च; शाॅपिंग ते फ्लाइट बुकिंगवर मिळणार सूट

अयोध्या बस स्थानकावरून पर्यटकांसाठी ५० इलेक्ट्रिक बस, २५ ग्रीन ऑटोचे लोकार्पण केले आहे. यामुळे केवळ भाविकांना फायदा होणार नाही, तर प्रदूषणही कमी होईल.

दिव्य अयोध्या डिजिटल पर्यटन मोबाइल ॲप्लिकेशनमध्ये वाहन बुकिंग, ऑनलाइन पार्किंग बुकिंग आणि नेव्हिगेशन करण्याच्या सुविधा आहेत. या मोबाइल ॲप्लिकेशनचा वापर करून हॉटेल, राहण्याची सोय (होम स्टे) आणि टेंटसुद्धा पर्यटक बुक करू शकणार आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर आणि गोल्फ कार्ट बुक करण्याचा पर्यायही उपलब्ध असणार आहे. तसेच या ॲपद्वारे पर्यटकांना प्रशिक्षित मार्गदर्शनकारांशी जोडले जाईल. एकंदरीतच अनेक पर्यटकांना या ॲपद्वारे अनेक फायदे होणार आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister yogi adityanath launched divya ayodhya tourism mobile app easy to navigate for tourists asp
Show comments