चंद्राच्या अतिदूरच्या (अंधाऱ्या) भागातील नमुने गोळा करून ते वैज्ञानिक अभ्यासासाठी पृथ्वीवर आणणारी चीनची ५३ दिवसांची ‘चांग-ई-६’ ही चंद्र तपासणी मोहीम काही दिवसांपूर्वी सुरू झाली होती. चीनच्या दक्षिणेकडील हैनान किनाऱ्यावरील ‘वेनचांग’ अंतराळ प्रक्षेपण केंद्रातून ‘लाँग मार्च-५ वाय रॉकेट’द्वारे ही मोहीम यशस्वी प्रक्षेपित झाल्याचे अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. ‘चांग-ई-६’ मोहिमेत ऑर्बिटर, लँडर, एसेंडर आणि री-एंट्री मॉडय़ूल आदी चार घटक समाविष्ट केले आहेत; तर आता त्याच संबंधित एक मोठी माहिती समोर येत आहे.
चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (CNSA) यांच्या माहितीनुसार, ‘चांग-ई-६’ हे अनेक उपकरणांनी सुसज्ज असून ते चंद्राच्या सतत सूर्यप्रकाशाखाली असणाऱ्या बाजूला असलेल्या दक्षिण ध्रुव – एटकेन बेसिन या विशाल खड्ड्यात ७:३८ वाजता (बेजिंग वेळ) यशस्वीरीत्या उतरले आहे. ३००० न्यूटन इंजिनने, सुमारे सहा मिनिटे काम केल्यानंतर चीनच्या ‘चांग-ई-६’ यानाने आज मंगळवारी सकाळी चंद्राच्या अतिदूरच्या (अंधाऱ्या) भागातील दगड, माती उचलले आहेत. नमुने घेण्याचे काम पूर्ण करून संबंधित नमुने यानाच्या एसेंडरच्या आत कंटेनरमध्ये ठेवले गेले. हे मानवाच्या चंद्राच्या शोध इतिहासातील एक महत्वपूर्ण पाऊल आहे आणि असे करणारा चीन हा पहिलाच देश आहे.
या मोहिमेअंतर्गत यानाने चंद्राच्या (अंधाऱ्या) बाजूला असलेल्या उच्च तापमानाच्या चाचणीचा सामना केला आहे. यात चंद्राचे नमुने घेण्याच्या दोन पद्धतींचा अवलंब करण्यात आला, ज्यामध्ये भूपृष्ठाचे नमुने गोळा करण्यासाठी ड्रिलचा वापर करणे आणि रोबोटिक हाताने पृष्ठभागावरील नमुने हस्तगत करणे आदींचा समावेश होता, असे नासाने म्हटले आहे. या पद्धतींमुळे आपोआप विविध साइट्सवर विविध नमुने गोळा करण्यात आले. लँडरवर स्थापित केलेले अनेक पेलोड्स, लँडिंग कॅमेरा, पॅनोरॅमिक कॅमेरा, चंद्रावरील माती आणि खडक उचलण्यात चांगले काम केले आणि नियोजित प्रमाणे वैज्ञानिक अन्वेषण केले, असे CNSA ने अहवालात म्हटले आहे. तसेच नमुने घेतल्यानंतर लँडरने चीनचा राष्ट्रध्वज प्रथमच चंद्राच्या दूरच्या बाजूला फडकावला.
चंद्रावरील दगड, माती गोळा केल्यानंतर एसेंडरकडून हे नमुने चंद्राच्या परिभ्रमण कक्षेतील री-एंट्री मॉड्यूलमध्ये हस्तांतरित करण्यासाठी पाठवले जातील. म्हणजेच हे नमुने लॅण्डरवर असलेल्या रॉकेट बुस्टरवर हलविल्यानंतर चंद्राच्या कक्षेत असलेल्या दूरच्या अंतराळाबरोबर जोडले जातील आणि पुन्हा पृथ्वीवर परत येतील. २५ जूनपर्यंत नमुने पृथ्वीवर येतील ; असे सीएनएसएस (CNSA) ने म्हटले आहे.