China Launches 10G Internet : प्रत्येक नागरिकापर्यंत वेगवान इंटरनेट सेवा पोहोचवण्यासाठी सध्या भारतात ५ जी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कॉलवर बोलण्यात अडथळे, एखादा व्हिडीओ, फोटो डाऊनलोड करण्यात अडचण या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आणि वेगवान इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी ही सेवा खूपच उपयोगी आहे. 5G सेवा असली तरीही एखादा सिनेमा डाऊनलोड करण्यात आपल्याला जास्तीत जास्त अर्धा ते एक तास लागतात बरोबर ना. पण, हेच जर अवघ्या काही सेकंदांत झालं तर…
तर हीच अशक्य गोष्टी शक्य करून दाखवणारा, आपल्याहून एक पाऊल नेहमी पुढेच असणारा चीन या देशाने आज सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकेल असे काहीतरी केले आहे. हुआवेई आणि चायना युनिकॉम यांनी मिळून हेबेई प्रांतातील सुनान काउंटीमध्ये चीनचे पहिले 10G ब्रॉडबँड नेटवर्क लाँच केले आहे, ज्यामुळे इंटरनेट पायाभूत सुविधांमध्ये चीनने मोठी झेप घेतली आहे, असे म्हणायला हरकत नाही, असे वृत्त अझरन्यूजने स्थानिक टेक आउटलेट मायड्रायव्हर्सच्या हवाल्याने दिले आहे.
हे हाय-स्पीड नेटवर्क अत्याधुनिक 50G पॅसिव्ह ऑप्टिकल नेटवर्क (PON) तंत्रज्ञानावर आधारित आहे. ऑप्टिकल फायबर अॅक्सेस नेटवर्कच्या मुख्य आर्किटेक्चरमध्ये केलेल्या अपग्रेडमुळे युजर्सची बँडविड्थ पारंपरिक गिगाबिट पातळीपासून 10G पातळीपर्यंत वाढते आणि नेटवर्क लेटन्सी मिलिसेकंद पातळीपर्यंत कमी होते.
पोस्ट नक्की बघा…
सेकेंदात डाउनलोड होणार दोन तासांची फिल्म (China 10G Network) :
तसेच दोन तासांचा सिनेमा फक्त काही सेकंदांत डाऊनलोड करण्याची क्षमता या नेटवर्कमध्ये आहे, असे सोशल मीडियावर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.तसेच नवीन नेटवर्क ९,८३४ एमबीपीएसचा डाउनलोड स्पीड आणि १,००८ एमबीपीएसचा अपलोड स्पीड, असा एका कुटुंबाने नोंदवला आहे; ज्यामध्ये तीन मिलिसेकंद इतकी कमी लेटन्सी होती, असेसुद्धा अहवालात म्हटले आहे.