संपूर्ण जगभरामध्ये आता ५ जी नेटवर्कची चर्चा सुरु आहे. जगातील अनेक देशांमध्ये ५जी नेटवर्क सुरु करण्यात आले आहे. भारतात सुद्धा रिलायन्स जिओ आणि एअरटेल या टेलिकॉम कंपन्यांनी अनेक शहरांमध्ये आपली ५जी सेवा सुरु केली आहे. मात्र आता चीन लवकरच या पुढील म्हणजे ६जी नेटवर्क लॉन्च करण्याची शक्यता आहे. ६जी वर चीनने काम करण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे. ४ जी नेटवर्कपेक्षा ५ जी नेटवर्क २० पटींनी वेगवान आहे. मात्र ६ जी लॉन्च झाल्यास हे सर्व रेकॉर्ड मोडीत काढणारे नेटवर्क असणार आहे.

६ जी वायरलेस इंटरनेट हे स्पीड, स्पेक्ट्रम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सुरक्षा आणि ऊर्जा कार्यक्षमतेच्या बाबतीत आणखी प्रगती करेल अशी अपेक्षा आहे. सध्या अनेक देशांमध्ये ५ जी सुरु झाले असले तरी बरेच देश ५ जी नेटवर्कसाठी संघर्ष करत आहेत. यामध्ये चीन देश लवकरच ६ जी वायरलेस नेटवर्क लॉन्च करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. तसेच चीन अल्ट्रा फास्ट वायरलेस इंटरनेटचे टेस्टिंग देखील करत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. ज्याचा स्पीड १०० Gbps इतका आहे. असे झाल्यास हे नेटवर्क ५जी पेक्षा कितीतरी पटीने वेगवान असणार आहे.

richard verma
Richard Verma : “भारत-अमेरिका संबंधांमुळे चीन आणि रशिया चिंतेत, कारण…”; अमेरिकेच्या अधिकाऱ्याचे विधान चर्चेत!
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
kenya cheetah india marathi news
विश्लेषण: नामिबिया, दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ आता केनियातून भारतात येणार चित्ते! गुजरातमध्ये चित्ता प्रकल्प यशस्वी होण्याची शक्यता किती?
Onion export decision delayed for three days due to technical reasons
कांदा निर्यातीचा निर्णय तांत्रिक कारणांमुळे तीन दिवसांपासून अधांतरी
India participation in the Russia Ukraine conflict peace process is important
…तरीसुद्धा युक्रेन-शांतता प्रयत्नांत भारत हवाच!
Volkswagen german factory marathi news
विश्लेषण: जर्मनीतील फोक्सवागेन कार कंपनीचा कारखाना बंद होणार? आर्थिक मंदीची लक्षणे?
World Bank forecast of 7 percent growth rate print eco news
विकास दराबाबत जागतिक बँकेचे ७ टक्क्यांचे भाकीत; कृषी, ग्रामीण क्षेत्राला उभारी पाहता अंदाजात वाढ
nse marahti news
जागतिक सकारात्मकतेने निर्देशांक तेजी कायम, ‘सेन्सेक्स’ ८२,३६५ च्या विक्रमी शिखरावर

हेही वाचा : आता जपानमध्ये सरकार चालवण्यासाठी होणार ChatGpt चा वापर; नवीन आयडिया शोधण्यासाठी आणि…

चीनच्या यशामुळे अमेरिकेला भरली धडकी

६जी नेटवर्क पहिल्यांदा कोण सुरु करणार याची स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामध्ये आपण मागे राहू की काय अशी भीती अमेरिकेला आहे.गेल्या शुक्रवारी, व्हाईट हाऊसने वायरलेस कनेक्टिव्हिटीच्या पुढील पिढीवर चर्चा करण्यासाठी उद्योग क्षेत्रामधील नेत्यांची भेट घेतली. इतर देश हे ६ जी नेटवर्क कनेक्टिव्हिटीच्या स्टॅंडर्डमध्ये आघाडीवर असतील आणि आपण मागे राहू अशी भीती अमेरिकेला सतावत आहे. मेरिकेला सर्वात जास्त चिंता ही चीनची आहे. थोडक्यात चीनने जर खरोखरच ६ जी नेटवर्क सुरू केले तर अमेरिकेची चिंता वाढणार आहे.

६ जी नेटवर्क (Image Credit-Financial Express)

चायना एरोस्पेस सायन्स अँड इंडस्ट्रीच्या द्वितीय अकादमीच्या २५ व्या संस्थेने प्रथमच टेरा हर्ट्झ (THz) वारंवारता स्तरावर यशस्वी वायरलेस ट्रांसमिशनचा अहवाल दिला आहे, ज्याने 100 Gbps डेटा स्पीड मिळवला आहे.म्हणजेच अमेरिकेत 1Gbps वर चालणार्‍या 5G सिग्नलपेक्षा ते वेगवान आहे. अमेरिकन सरकारने 6G संशोधनासाठी १ अब्ज डॉलर्स ठेवले आहेत, परंतु हे चीनला मागे टाकण्यासाठी पुरेसे आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा : Reliance Jioचा नवीन रेकॉर्ड; एका महिन्यात युजर्सनी वापरला तब्बल ‘इतका’ अब्ज डेटा; जाणून घ्या

६जी साठी या टेक्नॉलॉजीचा वापर होणार

ही टेक्नॉलॉजी टेरा हर्ट्झ फ्रिक्वेन्सीचा वापर करते. जे ५ जी साठी mmWave बँड्सप्रमाणे, सिग्नल अंतर आणि क्लाउड/फॉगमध्ये आव्हाने सादर करते. तथापि, टेरा हर्ट्झच्या मदतीने वायरलेस संचार जवळजवळ तसेच फायबरवर प्रसारित करू शकते. मात्र ६ जी नेटवर्क २०३० पर्यंत लॉन्च होण्याची शक्यता दिसून येत नाही.