Christmas 2022 Budget Friendly Tech Gifts : आज ख्रिसमस सन आहे. या दिवशी येशू क्रिस्तांचा जन्म झाला होता. हा दिवस लोक कुटुंबातील लोकांना, मित्रांना शुभेच्छा, भेट देऊन साजरा करतात. ख्रिसमस निमित्त कोणते गिफ्ट द्यावे, याबाबत तुम्ही गोधळात असाल तर आज आम्ही तुम्हाला काही पर्याय सूचवत आहोत. ही बजेट फ्रेंडली गॅजेट्स तुम्ही भेट देऊन ख्रिसमसचा आनंद द्विगुणित करू शकता.
१) स्मार्ट स्पिकर
या ख्रिसमसला तुम्ही आपल्या आवडत्या लोकांना स्मार्ट स्पीकर गिफ्ट करू शकता. Amazon Echo Dot हे चांगले गिफ्ट ठरू शकते. यामध्ये व्हॉइस कंट्रोल प्रणाली आहे ज्याद्वारे टीव्ही, गिजर, वॉटर मोटर, लाइट, एसी नियंत्रित करू शकता. व्हॉइस फीचरने तुम्ही घरातील लाइट्स नियंत्रित करू शकता. स्मार्ट होम बनवू शकता. तुम्ही गाणी ऐकू शकता. अमेझॉनवर या उपकरणाची लिस्टेड किंमत ४ हजार ९९९ रुपये असून त्यावर ११ टक्के सूट मिळत असल्याने किंमत ३ हजार ९९९ रुपये झाली आहे.
(200 MP कॅमेरा, १२ मिनिटांत फूल चार्ज होणाऱ्या फोनची आजपासून विक्री, कुठे मिळणार? जाणून घ्या)
२) हेडफोन
बोटचे हेडफोन्स लोकप्रिय आहेत आणि ते गिफ्टसाठी चांगला पर्याय ठरू शकतात. ख्रिसमसला तुम्ही boAt Rockerz 450 हेडफोन्स गिफ्ट करू शकता. अमेझॉनवर या वायरलेस हेडफोन्सची लिस्टेड किंमत ३९९० रुपये आहे, मात्र त्यावर ६९ टक्के सूट देण्यात आल्याने किंमत १२२० रुपये झाली आहे. boAt Rockerz 450 हेडफोन्समध्ये १५ तासांपर्यंतचा प्लेबॅक टाइम मिळतो.
३) स्मार्टवॉच
ख्रिसमसला तुम्ही realme Watch 3 Pro स्मार्टवॉच गिफ्ट म्हणून देऊ शकता. या स्मार्टवॉचमध्ये १.७८ इंच अमोलेड डिस्प्ले, ब्लूटूथ कॉलिंग आणि जीपीएस मिळते. या घड्याळीत ११० पेक्षा अधिक स्पोर्ट मोड मिळतात आणि ती १० दिवसांपर्यंत चालू शकते. फ्लिपकार्टवर या घड्याळीची लिस्टेड किंमत ६ हजार ९९९ रुपये असून तिच्यावर २८ टक्के सूट देण्यात आल्याने किंमत ४ हजार ९९९ रुपये झाली आहे.