सध्या ख्रिसमसनिमित्त ऑफिसमध्ये सीक्रेट सांता आणि बरेच काही खेळ मनोरंजनासाठी खेळण्यात येतात. या कार्यक्रमात खेळांबरोबर एकमेकांना काहीतरी खास गिफ्टसुद्धा देण्यात येतात. नेहमीच मेकअपचे सामान, घड्याळ, पर्स देऊन तुम्ही कंटाळला असाल, तर सध्याच्या स्मार्ट तंत्रज्ञानाच्या जगात भेट देण्यासाठी ‘गॅजेट’सारख्या पर्यायाचा विचार करू शकता. जर तुम्हीसुद्धा तुमच्या खास व्यक्तीस किंवा ऑफिस कर्मचाऱ्याला इअरपॉड्स, हेडसेट, जेबीएल स्पीकर देण्याचा विचार करीत असाल, तर काही खास पर्याय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

ख्रिसमसला गिफ्ट देण्यासाठी तुमच्यासमोर उपलब्ध आहेत खालील पाच टॉप पर्याय :

Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Husband picking up wife and play game see waht happend next funny video goes viral
“भावा बायकोला उचलून घ्यायचं म्हंजी खायचं काम नाय” ‘ही’ स्पर्धा पाहून पोट धरुन हसाल; VIDEO मध्ये पाहा शेवटी कोण जिंकलं
Viral video of disabled swiggy delivery boy doing food delivery by riding a cycle
परिश्रमाशिवाय पर्याय नाही! दिव्यांग असूनही करतोय फूड डिलिव्हरी, VIDEO पाहून वाटेल अभिमान
Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Narendra Modi statement that Congress wants to end OBC reservation
काँग्रेसला ओबीसी आरक्षण संपवायचे -मोदी
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका

१. ॲपल एअरपॉड्स प्रो जेन २ (Apple Airpods Pro Gen 2) : ॲपलचे एअरपॉड्समध्ये मॅगसेफ चार्जिंग केस आहे. ट्रान्स्परन्सी मोड, अडॅप्टिव्ह ऑडिओ आदी बऱ्याच गोष्टी सपोर्ट करतात. तसेच ते एच२ क्लिपसह उपलब्ध आहेत. त्याचबरोबर थ्रीडी साउंड आणि ३० तासांचा प्लेबॅक टाइमसुद्धा मिळतो.

२. सोनी इनझोन एचपी हेडसेट (Sony inzone H5 headset) : सोनीच्या या हेडफोन्समध्ये गेमिंगसाठी ३६० स्पेशल ध्वनी आहेत. तसेच यात बूम मायक्रोफोन आणि एआय-आधारित आवाज कमी करण्याच्या तंत्रज्ञानासह उपलब्ध आहे. सोनीचा हा हेडसेट (sony InZone H5) २८ तासांपर्यंत नॉन-स्टॉप गेमिंग अनुभव देतो. त्यात अडॅप्टिव्ह नॉइज कॅन्सलिंग टेक आणि एएनसी मोड आहेत; जे तुम्ही सेट करू शकता.

३. जेबीएल टूर वन एम२ (JBL Tour One M2) : जेबीएलचे हे टूर वन एम१ हेडसेट अडॅप्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन तंत्रज्ञानासह येते. त्यात ४ नॉइज-सेन्सिंग माइकचा वापर करण्यात आला आहे. फीचरमध्ये ॲम्बियंट साउंड, व्हॉइस कंट्रोलसह ४-माइक, एक स्मार्ट टॉक फीचर आणि बरेच काही उपलब्ध आहे. त्याचबरोबर तुम्हाला ५० तासांचा प्लेबॅक टाइमसुद्धा मिळतो.

हेही वाचा…Year Ender: २०२३ मध्ये ‘या’ एआय टूल्सची लागली ‘टॉप १०’मध्ये वर्णी; पाहा यादी….

४. सॅमसंग गॅलेक्सी बड्स २ प्रो (samsug galaxy buds 2 pro) : सॅमसंग कंपनीचे हे गॅलेक्सी बड्स २ प्रो सॅमसंग डिव्हायसेसवर 24bit Hi-Fi ऑडिओ वितरित करतील. तर टीडब्ल्यूएस इअरबड्स ३६० डिग्री ऑडिओ सपोर्टसह येतात. त्यामध्ये ॲक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन एएनसीसह आहे. हे इअरबड्स आवाज आणि गोंधळ ओळखण्यातही सक्षम आहेत. जेव्हा आजूबाजूचा आवाज येतो तेव्हा त्यातील अनावश्यक आवाज आपोआप कमी होतो. म्हणजेच कोणाशीही बोलण्यासाठी तुम्हाला इअरबड्स कानाबाहेर काढण्याची गरज नाही.

५. बोट एअर पॉड्स १२१ वी२ ( boat aiprpods 121 v2) : बोट कंपनीचे कॉम्पॅक्ट डिझाइनसह उपलब्ध असलेले हे इअरबड्स, गेमिंग आणि जबरदस्त साउंड क्वालिटीसाठी उत्तम मानले जातात. हे वायरलेस कनेक्टिव्हिटीसह सगळ्यात चांगले बोट इअरपॉड्स आहेत. तसेच हे इअरपॉड्स चार्ज करून तुम्ही १४ तासांपर्यंत वापरू शकता. तसेच हे इअरपॉड्स ८एमएम ड्रायव्हरसह परिपूर्ण आहेत; ज्यामुळे तुम्हाला आवाजाची उत्तम क्वालिटी मिळेल.तर, यंदा ख्रिसमसला तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणी, कुटुंबातील व्यक्ती आणि प्रियजनांना भेटवस्तू देण्याच्या दृष्टीने या गॅजेट्सचा विचार करू शकता.