गुगल क्रोम आणि मोझिलामध्ये अनेक धोकादायक बग्स आढळून आले आहेत. त्याचे गांभीर्य ओळखून, भारत सरकारची सायबर सुरक्षा एजन्सी असलेल्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने गुगल क्रोम आणि मोझिला चालवणाऱ्या सर्व वापरकर्त्यांना , या दोन्ही वेब ब्राउझरच्या नवीनतम आवृत्त्या डाउनलोड आणि अपडेट करण्याची सूचना दिली आहे. इतकंच नाही तर वापरकर्त्यांना क्रोम ब्राउझरची नवीनतम आवृत्ती गुगलवरून डाउनलोड करण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.भारतासह संपूर्ण जगाला इंटरनेटचं वेड लागलं आहे. अशी मोजकीच लोक असतील जी इंटरनेटचा वापर करत नाहीत. मोबाईल असो किंवा लॅपटॉप , इंटरनेट सर्फिंगसाठी गुगल क्रोम आणि मोझिलाचा सर्वाधिक वापर केला जातो. अँड्रॉईड स्मार्टफोन गुगलच्या ओएसवर काम करतात आणि अशा परिस्थितीत या दोन्ही कंपन्यांकडे करोडो लोकांचा डेटा आहे. जर तुम्हीही यापैकी कोणतेही वेब ब्राउझर वापरत असाल तर तुमचा वैयक्तिक डेटा धोक्यात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा