गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२२ मध्ये ओपनएआय कंपनीने आपला ChatGpt हा चॅटबॉट लॉन्च केला आहे. हा एक कृत्रिम चॅटबॉट आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये हे अतिशय लोकप्रिय झाले असून अनेक ठिकाणी याचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. निबंध लिहिणे, कादंबऱ्या लिहिणे तसेच इतर हव्या असलेल्या माहितीचा कंटेंट देण्याचे काम हा चॅटबॉट करतो. तसेच गुगलने आपले बार्ड आणि Bing सारखे अनेक चॅटबॉट लॉन्च झाले आहेत. मेटा देखील स्वतःचे मोठे भाषा मॉडेल डेव्हलप करत आहे.

मात्र या AI जनरेटिव्ह टूल्सनी कॉपीराईट समस्यांबद्दल अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्या डेटाच्या आधारे त्यांना प्रशिक्षित करण्यात आले होते तो डेटा मानवाने तयार केलेला होता. यामध्ये असा काही डेटा असतो जो कॉपीराईट कायद्यांद्वारे संरक्षित करण्यात करण्यात येतो. लेखकाच्या किंवा त्या डेटा ज्याच्या मालकीचा आहे त्याच्या परवानगीशिवाय याचा वापर केल्यास त्यावर खटला दाखल केला जाऊ शकतो. कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. AI जनरेटिव्ह टूल्सच्या बाबतीत अशीच एक घटना घडली आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

Shyam Manav comment on Ladki Bahin Yojana,
‘लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी’, काँग्रेसच्या सभेत अंनिसचे श्याम मानव म्हणाले….
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Padmashri Physicist Dr Rohini Godbole Memoirs by Researcher Dr Radhika Vinze
विज्ञानव्रती
readers reaction on different lokrang articles
पडसाद : हा तर बुद्धिभेद
Candidates say Raj Thackeray cheated citizens of Vaidarbh
उमेदवार म्हणतात राज ठाकरेंकडून वैदर्भियांची फसवणूक
Hyderabad Airport Bomb Threat
‘बॉम्ब’चा टोमणा मुलीला महागात पाडला, विमानतळावर उडाली खळबळ; मेटल डिटेक्टरच्या आवाजामुळे गोंधळात भर
narendra modi criticized congress rahul gandhi
“संविधानाच्या नावाखाली लाल पुस्तकं छापून काँग्रेसने…”; नांदेडच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!
The monkey pulled the girl's hair
‘त्याने तिचे केस ओढले आणि…’ माकडाबरोबर मस्ती करणं पडलं महागात; VIDEO पाहून बसेल शॉक

हेही वाचा : काही तासांतच Threads चे ‘एवढे’ मिलियन युजर्स; ट्विटर, इन्स्टाग्रामला किती कालावधी लागला? वाचा…

कॉमेडियन, लेखिका सारा सिल्व्हरमॅन ( Sarah Silverman ) यांनी मार्क झुकरबर्ग यांच्या मेटा आणि चॅटजीपीटीची मूळ कंपनी ओपनएआयवर त्यांचा कंटेंट कोणत्याही परवानगीशिवाय वापरल्याबद्दल खटला दाखल केला आहे. कॉमेडियन आणि लेखिका सारा सिल्व्हरमॅन यांनी he Bedwetter हे पुस्तक लिहिले आहे. चॅटजीपीटीने त्यांच्या पुस्तकातील सारांश सांगितला मात्र त्यांनी कधीही चॅटबॉटला प्रशिक्षित करण्यासाठी ओपनएआयला त्यांच्या पुस्तकातील कंटेंट वापरण्याची परवानगी दिली नाही असे सारा सिल्व्हरमॅन यांचे म्हणणे आहे.

OpenAI वर खटला दखल करणाऱ्या सिल्व्हरमन या काही एकमेव लेखिका नाहीत. Ararat चे लेखक ख्रिस्तोफर गोल्डन आणि सँडमॅन स्लिमचे लेखक रिचर्ड कॅड्रे यांनी देखील त्यांच्या पुस्तकातील कंटेंट परवानगीशिवाय वापरल्याबद्दल कंपनीवर खटला दाखल केला आहे. तिन्ही लेखक आर्थिक नुकसानभरपाईसह ज्युरी ट्रायलची मागणी करत आहेत.

”सारांशामध्ये काही तपशील चुकीचे आहेत.” मात्र तरीही कळत आहे की ChatGpt ”प्रशिक्षण डेटासेटमध्ये महत्वाच्या गोष्टींबद्दल माहिती ठेवते”, असे दाखल करण्यात आलेल्या खटल्यात म्हणण्यात आले आहे.

हेही वाचा : ट्विटरकडे आहेत ‘हे’ भन्नाट फीचर्स, मेटा Threads मध्ये मात्र अजूनही उपलब्ध नाहीत, एकदा पहाच

चॅटजीपीटी व्यतिरिक्त, मार्क झुकरबर्ग यांच्या मेटाला देखील लेखकांकडून खटल्याचा सामना करावा लागत आहे. रॉयटर्सच्या एका अहवालामध्ये सांगण्यात आले होते की, मेटा विरुद्धच्या खटल्यात, फिर्यादींनी आरोप केला आहे की कंपनीच्या कृत्रिम बुद्धिमत्ता व्यवसायाबद्दल लीक झालेल्या माहितीनुसार असे समोर आले की, चे काम परवानगीशिवाय वापरले गेले होते.

अहवालामध्ये पुढे म्हटले आहे की, सिल्व्हरमॅन, कद्रे आणि गोल्डन यांनी मेटा आणि ओपनएआयने ‘त्यांच्या तथाकथित मोठ्या भाषेचे मॉडेल विकसित करण्यासाठी त्यांच्या पुस्तकांचा वापर परवानगीशिवाय केल्याचा दावा केला आहे.