जगातील सर्वांत मोठा ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान कार्यक्रम सीईएस-२०२४ हा शो १२ जानेवारीपर्यंत चालणार आहे. या शोमध्ये १५० हून अधिक देशांतील ४०० कंपन्या त्यांची नवीन उत्पादने सादर करणार आहेत. तर गुगल कंपनीने सगळ्यात मोठ्या टेक शोमध्ये म्हणजेच कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो २०२४ मध्ये (Consumer Electronic Show 2024) अँड्रॉइड डिव्हाइससाठी नवीन फीचर्सची घोषणा केली आहे. हे फीचर्स अँड्रॉइड वापरकर्त्यांना केवळ मोबाइलमध्येच नाही, तर स्मार्ट टीव्ही, स्मार्ट होम एक्सेसरीज आणि EVs मध्येही वापरता येणार आहेत.

१. क्विक शेअर (Quick Share) :

Biggest Ola Season Boss Sale
मित्राने इलेक्ट्रिक स्कूटर घेतली, तर तुम्हाला ३००० रुपये मिळणार; पाहा कंपनीच्या Boss sale मध्ये काय ऑफर्स असणार?
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
MS Dhoni enjoying riding a bike in Ranchi after his holiday in America video gone viral
MS Dhoni : अमेरिकेतून परतल्यानंतर धोनीने बाईकवरुन फार्महाऊसमध्ये मारला फेरफटका, VIDEO व्हायरल
Tata nexon cng launched
टाटाचा नाद करायचा नाय! नव्या अवतारात लॉन्च झाली ही सीएनजी कार, पॉवरफुल इंजिन अन् मायलेजसह किंमतही कमी
Honda Elevate Apex Edition launched
Honda : एक लिटर पेट्रोलमध्ये १७ किलोमीटर धावणार; नवीन SUV चे फीचर्स, किंमत जाणून घ्या
Shaqkere Parris Hits 124 meter monster six video viral
CPL 2024 : शक्केरे पॅरिसने ठोकला १२४ मीटरचा गगनचुंबी षटकार, IPL मधील ॲल्बी मॉर्केलच्या विक्रमाची केली बरोबरी
Hyundai Venue Adventure Edition launch
Hyundai : शार्क-फिन अँटेना, डॅशकॅमसह बरीच फीचर्स; मार्केटमध्ये येतेय नवी SUV; किंमत फक्त…
iPhone 15 and 14 Price cut
Apple iPhone Price in India: iPhone १६ लाँच होताच iPhone 15 आणि iPhone 14 च्या किंमती घसरल्या, जाणून घ्या नवे दर

गुगलने निअरबाय शेअरचे (Nearby Share) नाव बदलून क्विक शेअर (Quick Share) केलं आहे. गुगलने रिब्रँडिंगसाठी सगळ्यात मोठ्या अँड्रॉइड स्मार्टफोन कंपनी सॅमसंगबरोबर भागीदारी (पार्टनरशिप) केली आहे. लॅपटॉप आणि विंडोज पीसी मॉडेल्स क्विक शेअरसह अँड्रॉइड डिव्हाइसशी कनेक्ट होऊ शकणार आहेत. तसेच गुगल कंपनी येत्या नवीन लाँच होणाऱ्या लॅपटॉपमध्ये क्विक शेअर प्री इन्स्टाॅल करण्यासाठी एलजीबरोबरसुद्धा भागीदारी करतो आहे. अपडेट लोगोसह क्विक शेअर पुढच्या महिन्यात ग्राहकांसाठी उपल्बध होईल.

२. स्मार्ट टीव्हीमध्ये करता येणार फास्ट पेअर (Fast Pair comes to Smart TVs) :

या फीचरच्या मदतीने अँड्रॉइड किंवा गुगल टीव्ही ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित स्मार्ट टीव्ही कनेक्ट करता येईल. युजर्स त्यांचे वायरलेस इयरबड्स गुगल टीव्ही ओएससह डिस्प्लेशी सहजपणे कनेक्ट करू शकतील.

हेही वाचा…CES 2024: LG ने केली कमाल! सादर केला जगातील पहिला वायरलेस ट्रान्सपरंट TV…

३. स्क्रिन कास्टिंग (Enhanced screen casting capabilities) :

वापरकर्ते एका क्लिकवर अँड्रॉइड स्मार्टफोन्सच्या मदतीने स्मार्ट टीव्हीवर लहान व्हिडीओ किंवा टिकटॉक व्हिडीओ पाहू शकणार आहेत. याशिवाय एलजी, हायसेन्स आणि टीसीएल आदी विविध ब्रँडमध्ये गुगल टीव्ही या स्क्रिन कास्टिंगचा पर्याय उपल्बध करून देणार आहे. बिल्ट-इन क्रोमकास्टसह येणाऱ्या टीव्ही मॉडेलमध्ये हे फीचर्स लवकरच उपल्बध होतील.

४. अँड्रॉइड ऑटोमध्ये नवीन पर्याय : (Better interoperability across devices with Matter and enhanced Android Auto ) :

गुगल टीव्ही ओएस चालवणाऱ्या टीव्ही मॉडेल्सव्यतिरिक्त विविध स्मार्ट होम उपकरणे नियंत्रित करण्याच्या क्षमतेसह स्मार्ट हब म्हणून काम करतील. स्मार्ट होम ॲक्सेसरीज एकाच उपकरणावरून नियंत्रित करणे सोपे जाईल. अँड्रॉइड ऑटोच्या पर्यायांमध्ये अपडेट करण्यात आलेला गुगल मॅप्स ॲप फीचरसुद्धा आहे. तसेच वापरकर्त्यांना EV साठी रिअल-टाइम बॅटरी इन्फो, बॅटरी लेव्हल, जवळचे चार्जिंग पॉइंट आदी फीचर्सचा यामध्ये समावेश असणार आहे.