Countries with the Most Expensive Internet: इंटरनेटचा सर्व क्षेत्रात वापर वाढलाय. एकमेकांशी संपर्क साधणं, माहिती गोळा करणं आणि माहिती साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संगणकीय मायाजालाची मोहिनी, आज प्रत्येकाच्या आयुष्याच्या कानाकोपऱ्यात पसरली आहे. संपर्कासाठी ई-मेल, व्हॉट्सअॅप, फेसबुकसारखे सोशल मीडिया, बातम्यांसाठी गुगल न्यूज, याहू न्यूज, अॅपल न्यूज, ट्विटरसारखी अॅप्लिकेशन्स वापरण्याकडे कल वाढत चालला आहे. संपूर्ण जग वेगाने डिजिटलायझेशनकडे धावत आहे आणि त्यासाठी प्रत्येक देशाला इंटरनेटची गरज आहे. भारतात, तुम्हाला रेल्वे स्टेशन, विमानतळ आणि इतर सार्वजनिक ठिकाणी मोफत वायफाय देखील मिळते, परंतु आजही असे अनेक देश आहेत जिथे इंटरनेट खरेदी करणे खूप महाग आहे. चला तर पाहूया कोणत्या देशात मिळतयं सर्वात महागडं इंटरनेट..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वात महाग इंटरनेट कुठे?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सर्वात महागड्या मोबाईल इंटरनेटच्या यादीत सेंट हेलेनाचे नाव सर्वात वर येते. येथे १ GB मोबाइल डेटासाठी ३,२७९.६५ रुपये खर्च करावे लागतात. दुसरीकडे,  Falkland Islands चे लोकं १ GB मोबाईल डेटासाठी ३,०७१ रुपये खर्च करतात. Sao Tome and Principe चा मोबाईल डेटा तिसरा सर्वात महाग आहे. येथे १ GB मोबाईल डेटासाठी २,३५५.५० रुपये द्यावे लागतील. Tokelau आणि Yemenची नावे अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. येथे तुम्हाला १ GB मोबाईल डेटासाठी १४२८ रुपये आणि १३२४ रुपये द्यावे लागतात.

(हे ही वाचा : तुमचा Wi-Fi रात्रीही सुरु असतो काय? किती धोकादायक आहे ते जाणून घ्या, अन्यथा भोगावे लागेल मोठे नुकसान )

‘या’ देशात मिळतो सर्वात स्वस्त इंटरनेट डेटा

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने विविध देशांमधील इंटरनेटबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे. सर्वात स्वस्त मोबाईल इंटरनेट इस्रायलमध्ये आहे, जिथे तुम्हाला १ GB डेटासाठी सुमारे ३.२९ रुपये मोजावे लागतील. त्याचवेळी, इटलीमध्ये १ GB डेटासाठी ९.५ रुपये मोजावे लागतात. जगात सर्वात स्वस्त इंटरनेट देणाऱ्या देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशात एक जीबी डेटाची किंमत १३.९८ रुपये आहे. 

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Countries with the most expensive internet israel has the worlds most affordable internet in the world pdb