Secret Folder Windows : विंडोज हे सर्वाधिक वापरले जाणारे ऑपरेटिंग सिस्टिम आहे. यामध्ये अनेक फीचर्स आहेत जे तुम्हालाही माहिती नसतील. तुम्हाला काही फाइल्स गुप्त ठेवायच्या असल्यास तुम्ही एका खास ट्रिकद्वारे त्या गुप्त ठेवू शकता. विशेष म्हणजे, ज्या फोल्डरमध्ये तुम्ही या फाइल्स ठेवाल त्या फोल्डरचे नाव आणि त्याचे आयकन हे कोणालाही दिसणार नाही. तो होमपेजवर किंवा फोल्डरमध्ये असेल, मात्र जेव्हा तुम्ही त्यावर माऊस न्याल तेव्हाच तो तुम्हाला तिथे असल्याचे लक्षात येईल. हे फोल्डर कसे तयार करायचे? जाणून घेऊया.

हे अदृश्य फोल्डर तयार करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा

open prison in india
खुले कारागृह म्हणजे काय? त्यात कैदी कसे राहतात आणि काय करतात?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
fire broke out at scrap warehouse at Kudalwadi in Chikhli on Monday morning
पिंपरी : चिखलीतील गोदामांच्या आग प्रकरणी जागा मालकाचा शोध
Rare book Exhibition organized by BNHS
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
how to remove bad smell from bathroom
बाथरूम आणि टॉयलेटमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरा ‘ही’ घरगुती ट्रिक
mla mahesh landge claim bangladeshi and rohingyas working in scrap warehouses
पिंपरी- चिंचवड: अनधिकृत भंगार गोदामात बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंगे; आमदार महेश लांडगे
cyber criminals come with scam idea which is Wedding Invitation Scam
‘वेडिंग इन्व्हिटेशन स्कॅम’ सायबर भामट्यांचा नवा फंडा; सावध राहा, अन्यथा…

नाव नसलेले फोल्डर तयार करण्यासाठी डेस्कटॉपवर कुठेही राइट क्लिक करा आणि न्यूवर क्लिक करून फोल्डरवर क्लिक करा. फोल्डर तयार झाल्यावर त्यावर पुन्हा राइट क्लिक करा आणि कंटेक्स्टच्युअल ऑपश्नमध्ये रिनेम निवडा.

(तीन कोटी प्रवाशांचा डेटा विक्रीला ठेवल्याचा दावा, रेल्वे मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण, म्हणाले डेटा ब्रीच..)

पुढच्या स्टेप्ससाठी तुमच्याकडे पूर्ण आकाराचा किबोर्ड (उजवीकडे नमपॅड असेलेला किबोर्ड) आवश्यक असेल. अल्ट + 0160 (ब्रेक स्पेस पडू नये यासाठी अल्ट कोड शॉर्टकट) टाइप करा आणि एन्टर दाबा. आता तुम्हाला नाव नसलेले फोल्डर दिसेल.

आयकन हटवण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा

फोल्डरचे आयकन हटवण्यासाठी पुन्हा फोल्डरवर राइट क्लिक करा आणि प्रॉपर्टीमध्ये जा. येथे तुम्ही कस्टमाइज टॅबवर नेविगेट करू शकता आणि नंतर चेंज आयकन हा सर्वात तळाशी असलेला पर्याय निवडा. डिफॉल्ट पर्यांयापैकी उजवीकडे स्क्रोल करा, तुम्हाला चार ब्लँक आयकन दिसून येतील, यापैकी कोणतेही निवडा.

(Foldable Iphone बाबत मोठी माहिती, कधी होणार लाँच, कसा असेल फोन? जाणून घ्या)

आता तुमच्याकडे नाव आणि आयकन नसलेले फोल्डर असेल. जेव्हा तुम्ही फोल्डरवर क्लिक कराल किंवा त्यास सिलेक्शन विंडोमध्ये समाविष्ट कराल किंवा त्यावर माऊस न्याल तेव्हा ते तुम्हाला दिसून येईल. तुम्ही असा फोल्डर वापरत असल्यास त्यास डेस्कटॉपच्या कॉर्नरवर ठेवा.

Story img Loader