जिओफोन नेक्स्ट नंतर रिलायन्स जिओ लॅपटॉप आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या पहिल्या लॅपटॉप JioBook ला हार्डवेअर मंजूरी मिळाली आहे. याबाबतचे ऑनलाइन तपशील लीक झाले आहेत. जिओच्या इतर प्रोडक्टप्रमाणे याचीही किंमत परवडणारी असेल असं सांगण्यात येत आहे. जिओ बूकची लॅपटॉप सेगमेंटमधील Xiaomi, Dell, Lenovo आणि इतर लॅपटॉपशी स्पर्धा असेल. जिओचा लॅपटॉप Windows 10 OS द्वारे समर्थित असेल आणि ARM आधारित प्रोसेसरवर चालेल. यामध्ये प्रॉडक्ट आयडी ४००८३००७८ देण्यात आला आहे. मात्र, या लॅपटॉपचा तपशील अद्याप उघड करण्यात आलेला नाही. सूचीमध्ये कंपनीचे नाव Emdoor Digital Technology Co LTD असे दाखवले आहे. म्हणजेच Jio विक्रेत्याकडून उत्पादन खरेदी करू शकते आणि स्वतःच्या ब्रँडिंगसह विकू शकते. JioBook म्हणून BIS प्रमाणपत्र प्राप्त झाले असून Geekbench बेंचमार्किंग ऍप्लिकेशनवर दिसले आहे.
JioPhone Next नंतर आता JioBook लॅपटॉपबाबत उत्सुकता; डिटेल्स झाले लीक
जिओफोन नेक्स्ट नंतर रिलायन्स जिओ लॅपटॉप आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या पहिल्या लॅपटॉप JioBook ला हार्डवेअर मंजूरी मिळाली आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-02-2022 at 15:38 IST
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curiosity about jiobook laptops after jiophone next rmt