Samsung कंपनीने unpacked इव्हेंटमध्ये galaxy S23 सिरीजमधील ३ स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. सॅमसंग ही एक दक्षिण कोरियाची कंपनी आहे. ही मोबाईल , लॅपटॉप आणि अन्य प्रॉडक्ट्सचे उत्पादन करते. सॅमसंगने लॉन्च केलेल्या सिरीजमध्ये Galaxy S23 Ultra, Galaxy S23 Plus आणि Galaxy S23 यांचा समावेश आहे.या फोन्सची विक्री २३ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या सिरीजमध्ये Galaxy S23 हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. कंपनी या फोन्सची विक्री मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देऊन करणार आहे. तर सॅमसंग कंपनी या फोनवर किती डिस्काउंट देणार ते जाणून घेऊयात.
Samsung Galaxy S23 ची किंमत
सॅमसंग गॅलॅक्सी एस २३ हा फोन दोन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत ही ७४,९९९ रूपये आहे. तर २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत ही ७९,९९९ रुपये आहे. सध्या कंपनी देणार असलेल्या डिस्काउंटमुळे हे दोन्ही व्हेरिएंटचे फोन सारख्याच किंमतीत खरेदी करता येणार आहे. ही ऑफर Amazon वर उपलब्ध असणार आहे.
हेही वाचा : Turkey Earthquake: भूकंपग्रस्त टर्कीत Twitter वर बंदी; एलॉन मस्क म्हणाले…
काय आहे डिस्काउंट ऑफर ?
Galaxy S23 वर कंपनी ५००० रुपयांचा डिस्काउंट देत आहे. तसेच या शिवाय फोनवर ८,००० रूपयांची बँकेची ऑफर मिळत आहे. ICICI बँकेचे डेबिट कार्ड वापरून या ऑफरचं लाभ खरेदीदारांना घेता येणार आहे. हा सर्व डिस्काउंट पाहता तुम्हाला हा फोनवर १३,००० रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. डिस्काउंटमुळे या फोनची किंमत ही ६६,९९९ रुपये झाली आहे. हा फोन ग्राहकांना खरेदीसाठी फॅंटम ब्लॅक, क्रीम, ग्रीन आणि लॅव्हेंडर या तीन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.
काय आहेत फीचर्स ?
Samsung Galaxy S23 या फोनमध्ये ६.१ इंचाचा डिस्प्ले येतो. यामध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरचा सपोर्ट येतो. तसेच यामध्ये ८ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटर्नल स्टोरेज वापरायला मिळते. हा फोनचा कॅमेरा ११२ मेगापिक्सल अल्ट्रावाईड लेन्स , ५० मेगापिक्सल प्रायमरी आणि १० मेगापिक्सल टेलीफोटो लेन्चा येतो. या फोनमध्ये ३,९०० mAh क्षमतेची बॅटरी येते. या फोनला फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळतो.