देशात बहुप्रतिक्षित अशा 5G नेटवर्कला सुरुवात झाली आहे. जीओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्यांनी आपल्या 5G सेवेची घोषणा केली आहे. जीओने सुरुवातीला चार शहरांमध्ये आपली सेवा सुरु केली आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसी या शहरांचा समावेश आहे. या शहरांमध्ये ग्राहकांना जीओ 5G चा अनुभव मिळत आहे. कंपनी आपली 5G सेवा वापरण्यासाठी वेलकम ऑफरदेखील देत आहे. या अंतर्गत युजर्सना 1GBps च्या स्पीडने अनलिमिटेड डेटा मिळत आहे.

गेल्या आठवड्यात इंडिया मोबाईल काँग्रेस २०२२ या कार्यक्रमात, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पुष्टी केली की, पॅन इंडिया जीओ सेवा २०२३ डिसेंबरपर्यंत रोलआउट होईल. तर Airtel ने म्हटले आहे की मार्च २०२४ पर्यंत त्यांची 5G सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल.जीओने पात्र वापरकर्त्यांसाठी वेलकम ऑफरची घोषणा केली. आता हे पात्र वापरकर्ते कोण आहेत व ही वेलकम ऑफर कशी मिळविता येईल, जाणून घेऊया सविस्तर…

Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
elon musk internet on mars
एलॉन मस्क मंगळावर पोहोचवणार इंटरनेट सेवा? कारण काय? त्याचा फायदा कोणाला?
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
Mumbai metro marathi news
मेट्रो कनेक्ट ३ ॲप ॲन्ड्रॉईड फोनवर अपडेट करू नका, एमएमआरसीचे प्रवाशांना आवाहन, तांत्रिक अडचणींमुळे अपडेट केल्यानंतर ॲप होते बंद
Revanth Reddy Express Adda
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी एक्स्प्रेस अड्डावर, पाहा मुलाखत लाईव्ह

आणखी वाचा : ‘हा’ आहे जिओचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन! किंमत जाणून घ्या

जीओ वेलकम ऑफरचे आमंत्रण कसे मिळवायचे?

जीओने आमंत्रण कसे कार्य करते याबद्दल बरेच तपशील उघड केले नसले तरी, TelecomTalk कडून येणारा अहवाल सूचित करतो की, वेलकम ऑफर आमंत्रण MyJio अॅपवर दिसेल. जीओ निवडक युजर्सना 5G सेवेचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रणे पाठवत आहे. तुम्हाला हे आमंत्रण My Jio अॅपवर मिळेल. यासाठी तुम्हाला My Jio अॅपवर जावे लागेल आणि तुम्हाला आमंत्रण आले की नाही, हे नोटिफिकेशमध्ये तपासावे लागेल.

तसे, तुम्हाला My Jio अॅपवर त्याचे आमंत्रण होमपेजवरच दिसेल. कंपनीने या आमंत्रणावर एक अटही ठेवली आहे. ज्याची माहिती ऑफरमध्ये देण्यात आलेली नाही. जीओ 5G सेवेचा अनुभव फक्त अशा ग्राहकांचा मिळेल, ज्यांनी किमान २३९ रुपयांचा रिचार्ज केला आहे. म्हणजेच वेलकम ऑफरचा लाभ फक्त अशा ग्राहकांना मिळेल, ज्यांच्या फोनवर २३९ रुपये किंवा त्याहून अधिक रिचार्ज असेल.

कंपनीने सांगितल्याप्रमाणे, पोस्टपेड आणि प्रीपेड दोन्ही ग्राहकांना जिओ 5G चा लाभ मिळेल, जर त्यांनी रुपये २३९ किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्ज केले असेल. टेलिकाॅम रिपोर्टनुसार, जर तुमच्या फोनमध्ये यापेक्षा कमी रिचार्ज असेल तर तुम्ही जीओ वापरु शकणार नाही. या ब्रॅंड्सवर उपलब्ध असलेली सेवा जीओने दस-याच्या मुहूर्तावर चार शहरांमध्ये सुरु केली आहे.