Cyrus Mistry Car Accident: नुकतेच टाटाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे कर अपघातात निधन झाल्याची बातमी समोर आली. त्यामुळे देशभरात शोककळा पसरली. या ५४ वर्षीय व्यावसायिकाचे अचानक जग सोडून जाणे अतिशय दुःखद होते. आपल्या कारमध्ये मागे बसलेल्या सायरस मिस्त्री यांनी बेल्ट न लावल्याने ते या अपघाताचे बळी ठरले, असे सांगितले जात आहे. तेव्हापासून सीट बेल्टच्या महत्त्वावर बरीच चर्चा झाली. दरम्यान, सरकारने शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉनसाठी आदेश जारी केला असून प्रोडक्टच्या विक्रीवरही बंदी घातली आहे.
सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर सरकारने अॅमेझॉनसाठी जारी केला आदेश!
या भीषण अपघातानंतर सीट बेल्टची गरज आणि महत्त्व यावर बरीच चर्चा होत असून याला पुढे नेत सरकारने ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon साठी ऑर्डर जारी केली आहे. परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केवळ नियमच जारी केले नाहीत तर एका प्रोडक्टच्या विक्रीवरही बंदी घातली.
आणखी वाचा : Volkswagen Taigun Anniversary Edition नवीन कलर थीमसह भारतात लॉंच, ११ नवीन फीचर्स मिळतील
हे प्रोडक्ट विकण्यास मनाई
नितीन गडकरी यांनी Amazon ला त्यांच्या साइटवर सीटबेल्ट अलार्म ब्लॉकर्सची विक्री थांबवण्याची विनंती केली आहे. रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी म्हणाले की, बरेच लोक अॅमेझॉनवरून क्लिप खरेदी करतात ज्याचा वापर सीट बेल्ट अलार्म ब्लॉक करण्यासाठी केला जातो. या प्रोडक्टची विक्री थांबवण्यासाठी अॅमेझॉनला नोटीस पाठवण्यात आली आहे.
NCRB 2021 च्या अहवालानुसार, भारतात रस्ते अपघातांमुळे १,५५,६२२ मृत्यू झाले आहेत आणि त्यापैकी ६९, २४० अपघात हे दुचाकी वाहनांमुळे झाले आहेत. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, भारतातील मृत्यूची नोंद दर चार मिनिटांनी एक मृत्यू आहे.