जवळपास एक किलोमीटर मोठे असणारे अ‍ॅस्ट्रोइड पृथ्वीकडे येत असल्याची माहिती ‘नासा’ने दिलेली आहे. या अ‍ॅस्ट्रोइडच्या व्यासाची लांबी ५०० पासून ८५० मीटरपर्यंत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ‘नासा’नुसार दोन्ही अ‍ॅस्ट्रोइडला ४८८४५३ (१९९४ XD) आणि २०२० DB5 संबोधले आहे.
अ‍ॅस्ट्रोइड ४८८४५३ (१९९४ XD) १२ जूनला पृथ्वीच्या जवळ येऊन गेला तर २०२० DB5 १५ जूनला पृथ्वीच्या जवळ येणार आहे. ‘नासा’ने याविषयी सविस्तर माहिती दिली. हे दोन्ही अ‍ॅस्ट्रोइड तितकेच विनाशकारी असल्याचे म्हटले जाते; कारण या अ‍ॅस्ट्रोइडच्या व्यासाची लांबी ही १५० मीटरपेक्षा अधिक आहे.

हेही वाचा : आता धावता धावतादेखील अटेंड करू शकता मीटिंग, गूगल Meet मध्ये लवकरच आणणार ‘हे’ भन्नाट फिचर

१. अ‍ॅस्ट्रोइडला ४८८४५३ (१९९४ XD)

अ‍ॅस्ट्रोइड ४८८४५३ (१९९४ XD) हा ७७,२९२ किमी प्रति तासाच्या वेगाने पृथ्वीजवळून जाणार असल्याचे म्हटले जात होते. हा अ‍ॅस्ट्रोइड पृथ्वीच्या ३१,६२, ४९८ किमी अंतरावरुन गेला, असे म्हटले जात आहे.

२. अ‍ॅस्ट्रोइड (२०२० DB5)

अ‍ॅस्ट्रोइड (२०२० DB5) ३४,२७२ किमी प्रति तासाच्या वेगाने पृथ्वीजवळून जाणार आहे. पृथ्वीजवळून हा अ‍ॅस्ट्रोइड ४३, ०८,४१८ च्या अंतरावर असणार आहे.

हेही वाचा : उन्हाळ्यात AC वापरताना लक्षात ठेवा ‘या’ ५ गोष्टी, तुमचे वीज बिल येऊ शकते कमी!

अ‍ॅस्ट्रोइड सहसा पृथ्वीवर कोणताही धोका निर्माण करत नाही, मात्र सतर्क राहणेही तितकेच महत्त्वाचे असते. The Jet Propulsion Laboratory नुसार यानंतर आणखी एक अ‍ॅस्ट्रोइड पृथ्वीकडे २ मे २०२४ रोजी येणार आहे.