प्रत्येक गुगल अकाउंट वापरकर्त्याला गुगल १५ जीबीचे स्टोरेज देते. हे स्टोरेज फोटो, फाइल्स आणि मेल्स या सर्वांसाठी देण्यात आले असले तरीही यातील अर्ध्याहून अधिक जागा मात्र प्रमोशनल आणि मार्केटिंग इमेल्सने भरून जाते. वेळोवेळी अनावश्यक इमेल्स डिलीट करण्याची तशी सूचनादेखील त्यांच्याकडून मिळत असते. परंतु, एवढे ईमेल्स एका क्लिकवर याआधी डिलीट करण्याची सोय नसल्याने, प्रत्येक पेजवरील मेसेजेस आणि ईमेल्स सिलेक्ट करून मगच ते डिलीट करता येत असे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पण, आता तुम्हाला नको असलेले किंवा ठरावीक कॅटेगरीमधील सर्व ईमेल्स तुम्हाला अगदी सहज डिलीट करता येणार आहे. या नवीन ऑप्शनमुळे वापरकर्त्यांना अगदी सोप्या पद्धतीने आपल्या गूगल अकाउंटवरील स्टोरेज रिकामे करता येणार असून, एकाच वेळी भरपूर ईमेल्स डिलीट करता येतील. असे करण्यासाठी नेमक्या स्टेप्स काय आहेत ते पाहा.

हेही वाचा : गुगल अकाउंट डिलीट कसे करायचे असा प्रश्न पडलाय? या सोप्या स्टेप्स लक्षात ठेवा, पाहा

एका क्लिकवर सर्व इमेल्स डीलीट कसे करावे?

१. सर्वप्रथम आपले गूगल अकाउंट उघडावे

२. डावीकडे असणाऱ्या चेकबॉक्समध्ये क्लिक करा. या बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर त्या पानावरील सर्व ईमेल्स सिलेक्ट होतील.

३. त्यानंतर ‘सिलेक्ट ऑल एक्स कन्व्हर्सेशन्स इन प्रायमरी’ या निळ्या रंगात दिसणाऱ्या मेसेजवर क्लिक करा. असे केल्याने तुमचे सर्व इमेल्स सिलेक्ट होतील [इतर पानावरीलसुद्धा]

४. कचऱ्याच्या डब्यासारखे दिसणाऱ्या चिन्हावर म्हणजेच ‘डिलीट’वर क्लिक करा. त्यामुळे तुम्ही सिलेक्ट केलेले सर्व ईमेल्स डिलीट होतील.

५. इनबॉक्सव्यतिरिक्त प्रमोशनल आणि सोशल कॅटेगरीमधली सर्व ईमेल्स डिलीट करण्यासाठीदेखील वरील स्टेप्सचा वापर करता येऊ शकतो.

हेही वाचा : इन्स्टाग्रामवर एकापेक्षा अधिक अकाऊंट अॅड आणि स्विच कसे करायचे? तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, तर लक्षात घ्या या सोप्या टिप्स…

परंतु, जर तुम्हला तुमच्या अकाउंटमधील सर्व ईमेल्स काढून न टाकता, ठरावीक एका व्यक्तीचे किंवा तारखेचे ईमेल्स डिलीट करायचे असल्यास खालील स्टेप्सची मदत घेऊ शकता.

१. आपल्या जीमेल अकाउंटमध्ये लॉग इन करून सर्च बार मध्ये तुम्हाला ज्या व्यक्तीचे ईमेल्स नको असतील अशा व्यक्तीचे नाव किंवा तारीख टाका.

२. त्यानंतर तुम्हाला हव्या असणाऱ्या व्यक्तीचे किंवा त्या ठरावीक तारखेचे सर्व ईमेल्स आल्यानंतर चेकबॉक्समध्ये क्लिक करून सर्व ईमेल्स सिलेक्ट करावे.

३. कचऱ्याच्या डब्यासारखे दिसणाऱ्या डिलीट या चिन्हावर क्लिक करून सर्व अनावश्यक मेसेजेस आणि इमेल्स डिलीट करावेत.

परंतु, कधी एखादा ईमेल चुकून डिलीट झाल्यात ३० दिवसांच्या आत तुम्हाला तो ट्रॅश फोल्डरमधून पुन्हा मिळवता [रिकव्हर] येतो, अशी माहिती इंडिया टुडेच्या एका लेखातून समजते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delete all your emails only with one click here is the easy and simple steps dha